Pandharpur News : काय सांगता, अभिनंदनाच्या बॅनरवर ज्याची जाहिरात त्याच आमदाराचा फोटो गायब? पंढरपुरात बॅनरबाजी एकच चर्चा
Pandharpur News : आमदार समाधान अवताडे यांना शुभेच्छा दिलेल्या बॅनर मध्ये खुद्द अवताडे यांचा फोटो गायब असल्याने या बॅनरची एकच चर्चा सर्वत्र रंगली आहे.
पंढरपूर : सध्या निवडून आलेल्या आमदारांचे सर्वत्र मोठ-मोठे फलक आणि बॅनर झळकताना दिसत आहेत. मात्र ज्याचे अभिनंदन करायचे त्याचा फोटोच बोर्डवर गायब असेल तर काय होईल. होय अशीच मजेशीर गोष्ट पंढरपूर शहरात घडली असून आमदार समाधान अवताडे (Samadhan Autade) यांना शुभेच्छा दिलेल्या बॅनर मध्ये खुद्द अवताडे यांचा फोटो गायब आहे. पंढरपूर शहरातील अंबाबाई पटांगण या ठिकाणी आमदारा अवताडे यांच्या अभिनंदन करणारे फलक कार्यकर्त्यांनी लावले आहेत. मात्र या फलकावरील अवताडे यांचा फोटो गायब असल्याने हा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
ज्याची जाहिरात त्याच आमदाराचा फोटो गायब?
आमदारा अवताडे यांच्या अभिनंदन करणाऱ्या या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी नगराध्यक्ष व नगरसेवकांचे फोटो लावलेत. मात्र यात ज्यांचे अभिनंदन करतो ते आमदार समाधान अवताडे यांचाच फोटो विसरले आहेत. शहरात इतर ठिकाणीही परिचारक समर्थकांनी जिंकल्याच्या शुभेच्छा देताना कोणत्याच बॅनर वर अवताडे यांचा फोटो ठेवलेला नाही. मात्र निवडून आलेले आमदार समाधान आवताडे मात्र त्यांच्याच अभिनंदन फलकावर त्यांचाच फोटो नाही अशी मजेशीर बॅनरबाजी पंढरपुरात सध्या दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, रयत क्रांती संघटनेचं विठुरायाला साकडं
महाराष्ट्र राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं आहे. त्यांमुळं राज्यात महायुतीचीच पुन्हा सत्ता येणार आहे. मात्र, राज्यात नवा मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीनं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी केली आहे. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून रयत क्रांती संघेटनेच्या (Rayat Kranti Sanghatana) कार्यकर्त्यांनी पंढरपूरच्या विठुरायाला दुग्धाभिषेक करुन पेढे वाटत साकडं घातलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्याच्या नवीन सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले व पदाधिकाऱ्यांनी नामदेव पायरी जवळ विठुरायाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केला. देवेंद्र फडणवीस हेच खरे बहुजन उद्धारक असून शेतकऱ्याची जाण केवळ त्यांना आहे. शेतकरी कर्जमुक्तीसाठी फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असे साकडे विठुरायाला घातल्याचे रयत क्रांती संघटनेचे नेते दीपक भोसले यांनी सांगितले. यावेळी रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिर परिसरातील भाविकांना आणि नागरिकांना पेढ्यांचे वाटप केले.
हे ही वाचा