एक्स्प्लोर

Marathwada Lok Sabha Election : आचारसंहिता जाहीर! मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मतदान कधी, निकाल कधी?

Lok Sabha Election  2024 : मराठवाड्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघासाठी देखील तारखा जाहीर झाल्या आहेत.

Lok Sabha Election 2024 Date Announcement : अखेर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024 Dates) तारखा जाहीर करण्यात आल्या असून, एकूण सात टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. तर, महाराष्ट्रातील सर्व 48 जागांसाठी ही निवडणूक एकूण पाच टप्प्यात पार पडणार आहे. याचवेळी मराठवाड्यातील (Marathwada) एकूण आठ लोकसभा मतदारसंघासाठी देखील तारखा जाहीर झाल्या असून, मराठवाड्यात तीन टप्प्यात निवडणूक होता आहे. देशाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त एस.एस.सिंह आणि ज्ञानेश कुमारही हे देखील यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत हिंसेला कोणतेही स्थान नसणार असून, या विरोधात कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याचे राजीव कुमार म्हणाले आहेत. 

मराठवाड्यात नांदेड लोकसभा मतदारसंघ (Nanded Lok Sabha Constituency), परभणी लोकसभा मतदारसंघ (Parbhani Lok Sabha Constituency), जालना लोकसभा मतदारसंघ (Jalna Lok Sabha Constituency), छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency), हिंगोली लोकसभा मतदारसंघ (Hingoli Lok Sabha Constituency), बीड लोकसभा मतदारसंघ (Beed Lok Sabha Constituency), धाराशिव लोकसभा मतदारसंघ (Dharashiv Lok Sabha Constituency), लातूर लोकसभा मतदारसंघाचा (Latur Lok Sabha Constituency) समावेश आहे. 

कोणत्या मतदारसंघात कधी निवडणूक...

मतदारसंघ नाव  मतदान तारीख  निवडणूक निकाल 
हिंगोली  26 एप्रिल 2024  04 जून 2024
नांदेड  26 एप्रिल 2024  04 जून 2024
परभणी  26 एप्रिल 2024  04 जून 2024
धाराशिव  07 मे 2024 04 जून 2024
लातूर 07 मे 2024 04 जून 2024
जालना  13 मे 2024 04 जून 2024
छत्रपती संभाजीनगर 13 मे 2024 04 जून 2024
बीड    13 मे 2024 04 जून 2024

निवडणूक प्रक्रियेत दीड कोटी कर्मचारी आणि अधिकारी असतील

निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विज्ञान भवनात झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषेदत या तारखा जाहीर केल्या आहेत. यावेळी बोलतांना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, “एकूण 97 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. 10. 5 लाख पोलिंग स्टेशन असणार आहे. दीड कोटी कर्मचारी आणि अधिकारी असतील. लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 55 लाख इव्हीएम मशीन असतील. तसेच 4 लाख वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 1. 8 कोटी युवक पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. 

महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?

पहिला टप्पा  : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर  (विदर्भातील 5)

दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ - 8) 

तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ - 11 )

चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड  (एकूण मतदारसंघ - 11 )

पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ - 13 )

इतर महत्वाच्या बातम्या : 

Lok Sabha Election 2024 Date LIVE : अवघ्या काही क्षणात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद LIVE

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget