Lok Sabha Election 2024 Date LIVE : महाराष्ट्रात 5 टप्यात होणार निवडणुका; मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती
Lok Sabha Election 2024 Date LIVE Updates : लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत घोषणा केली
LIVE
Background
Election Commission to announce the schedule for General Elections 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त एस.एस.सिंह आणि ज्ञानेश कुमार यांनी लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत, देशातील सध्याचे मतदार, नवमतदार, महिला आणि पुरुष मतदारांची संख्या यासह सर्व यंत्रणेच्या सज्जतेची माहिती दिली.य
2019 मध्ये 10 मार्च रोजी घोषणा
गेल्या वेळी 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांची तारीख 10 मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. गेल्या वेळी 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. गेल्या वेळी 67.1 टक्के मतदान झाले होते. तर 23 मे रोजी मतमोजणी झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे 97 कोटी लोक मतदान करणार आहेत. यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील, असा दावा आयोगाने केला आहे.
2019 मधील लोकसभा निवडणूक निकालाचे परिणाम काय?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 2014 च्या तुलनेत मोठा विजय मिळवला होता. 2014 मध्ये भाजपनं 282 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 303 जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 37.7 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली होती, तर NDA ला 45 टक्के मतं मिळाली होती. काँग्रेसला केवळ 52 जागा जिंकता आल्या होत्या.
Lok Sabha Election 2024 Dates LIVE : महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान
Lok Sabha Election 2024 Dates LIVE : पहिला टप्पा : मतदान- 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (विदर्भातील 5)
दुसरा टप्पा : मतदान- 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ - 8)
तिसरा टप्पा : मतदान- 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ - 11 )
चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ - 11 )
पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ - 13 )
Loksabha Election 2024 : या दिवशी होणार महाराष्ट्रात मतदान महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहे.
Loksabha Election 2024 : या दिवशी होणार महाराष्ट्रात मतदान महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणुका होणार आहे.
पहिला टप्पा - 19 एप्रिल
दुसरा टप्पा - 26 एप्रिल
तिसरा टप्पा - 7 मे
चौथा टप्पा - 13 मे
पाचवा टप्पा - 20 मे
Lok Sabha Election 2024 Dates LIVE : मुंबईत 20 मे रोजी होणार मतदान
Lok Sabha Election 2024 Dates LIVE : लोकसभा निवडणुका 2024 मध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या टप्यात निवडणुका होणार आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये मुंबईत पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुका या सात टप्प्यात होणार आहेत. त्यानुसार कोणत्या टप्यात कधी निवडणुका होणार हे जाणून घेऊया
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुका या सात टप्प्यात होणार आहेत. त्यानुसार कोणत्या टप्यात कधी निवडणुका होणार हे जाणून घेऊया
पहिल्या टप्प्यात -19 एप्रिल
दुसऱ्या टप्प्यात - 26 एप्रिल
तिसरा टप्पा - 7 मे
चौथा टप्पा - 13 मे
पाचवा टप्पा - 20 मे
सहावा टप्पा - 25 मे
सातवा टप्पा - 1 जून
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल
महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. 26 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल
26 एप्रिल
7 मे
13 मे
20 मे
25 मे