निवडून येईल त्याच ठिकाणी उमेदवार उभा करणार , 24 ऑक्टोबरला मनोज जरांगेंनी बोलावली इच्छुकांची बैठक
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024: प्रत्येकालाच वाटतं मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे. पण एक उमेदवार देण्याचा प्रयत्न असेल असं मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले.
Manoj Jarange Patil : प्रत्येकालाच वाटतं मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे. तुम्ही सगळेजण जरी म्हणालेत मलाच पाहिजे तरी मी रुसणार नाही रागावणार नाही. पण एक उमेदवार देण्याचा प्रयत्न असेल असं मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केले. मी राजकीय नेतृत्व करणार नाही, मी पक्षासारखं मतही लादणार नाही. सगळ्यांचे योगदान आहे. माझ्यासाठी सगळे सारखे असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. एका मतदारसंघातून चार-पाच जण अर्ज भरा. कुणीही बाँड लिहून देऊ नका आधी आम्हाला विचारा. ज्याने आपली जिरवली त्याची आपल्याला जिरवायची हे सुद्धा डोक्यात ठेवायचं असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.
मराठा समाजाच योगदान इच्छुक उमेदवारांनी डोळ्यासमोर ठेवावं
मराठा समाजाच योगदान इच्छुक उमेदवारांनी डोळ्यासमोर ठेवावं असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 20 ऑक्टोबरला इच्छुकांची आपण बैठक घेतली होती ती लढायचं की पाडायच यासाठी होती. आता 24 ऑक्टोबरला पुन्हा एकदा आपण इच्छुकांची बैठक घेत आहोत. आपण त्यांना सांगितलं होतं की मतदार संघात बैठक घ्या आणि एक उमेदवार ठरवा. पण त्यांच्या त्यांच्यात मेळ जमायचा काही अंदाज दिसत नाही असे जरांगे म्हणाले. मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही मी सामाजिक नेतृत्व करणार असल्याचे मनो जरांग म्हणाले. 24 ऑक्टोबरला सगळ्या इच्छुकांनी अंतरवाली सराटीत यायचं असेही जरांगे म्हणाले.
एका मतदारसंघातून चार-पाच जण अर्ज भरा
मोठा समाज आहे, मतभेद असतात, पटत नाही पण सगळ्यांनी अंतरवाली यायचं आहे. मी अर्ज भरा म्हणलो म्हणजे कोणीही अर्ज भरत बसू नका. एका मतदारसंघातून चार-पाच जण अर्ज भरा.कु णीही बाँड लिहून देऊ नका आधी आम्हाला विचारा असेही जरांगे म्हणाले. ज्याने आपली जिरवली त्याची आपल्याला जिरवायची हे सुद्धा डोक्यात ठेवा असे जरांगे म्हणाले. मी ठराविक मतदारसंघात निवडून येईल त्याच ठिकाणी उमेदवार उभा करणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. मी ठराविकच मतदारसंघ निवडणार असल्याचे जरांगे म्हणाले.
अंतरवली सराटीत इच्छुकांच्या गाठीभेटी सुरु
विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) बिगुल वाजल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी निवडणुकीची आपली भूमिका जाहीर केली आहे. राज्यातील काही निवडक मतदार संघात आपण उमेदवार जाहीर करणार असे म्हणत मराठा आरक्षणासंदर्भात 500 रुपयांच्या बॉण्डवर जो लिहून देईल त्याला पाठिंबा देणार असल्याचे सांगितल्यानंतर अंतरवली सराटीत इच्छुकांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.