एक्स्प्लोर

माजलगाव विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा : भाजपचे तिकीट कोणाला? सस्पेन्स कायम

उत्पादक शेतकर्‍यांचा मतदारसंघ असलेल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात तीन साखर कारखाने आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संभाव्य उमेदवार असलेल्या प्रमुख राजकीय नेत्यांकडे साखर कारखाने आहेत हे विशेष..

बीड जिल्ह्यातील सगळ्यात समृद्ध विधानसभा मतदारसंघ म्हणून माजलगाव विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. उत्पादक शेतकर्‍यांचा मतदारसंघ असलेल्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात तीन साखर कारखाने आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये संभाव्य उमेदवार असलेल्या प्रमुख राजकीय नेत्यांकडे साखर कारखाने आहेत हे विशेष.. मागच्या नऊ विधानसभा निवडणुकीचा विचार करता अपवाद प्रकाश सोळंके यांचा वगळता या मतदारसंघातून कोणीही दुसऱ्यांदा आमदार झाला नाही. या विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक आमदार म्हणून निवडून येण्याचा मान प्रकाश सोळंके यांना मिळतो. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश सोळंके यांचा भाजपाच्या आर टी देशमुख यांनी 37 हजार 245 मतांनी पराभव केला होता. सोळंके कुटुंबीयांची सर्वाधिक सत्ता माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक काळ सत्ता राहिली ती सोळंके कुटुंबीयांची. प्रकाश सोळंके यांचे वडील सुंदरराव सोळंके हे 1978 साली काँग्रेसकडून या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा होते. या विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रकाश सोळंके हे तीन वेळा आमदार झाले. त्यातले दोन वेळा म्हणजे 1999 आणि 2004 साली भाजपाच्या तिकीटावर आणि 2009 साली ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी काही काळ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून सुद्धा काम पाहिले होते. गोविंदराव डक राजकारणातील भारदस्त व्यक्तिमत्त्व 1980 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या सुंदरराव सोळंके यांचा काँग्रेसच्या गोविंदराव डक यांनी पराभव केला आणि त्यानंतर बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक भारदस्त व्यक्तिमत्त्व म्हणून गोविंद डक हे पुढे आले. 139 किलो वजन आणि तब्बल साडेसहा 6.7 फूट उंची यामुळे गोविंद डक यांना बघायला त्याकाळात अनेक लोक माजलगावला येत असत. एकही दिवस शाळेत न गेलेले गोविंदराव इंग्रजीसुद्धा अगदी सहज बोलायचे ही त्यांची वेगळी ओळख. डोक्यावर टोपी, अंगात सदरा आणि पायजमा घातलेल्या गोविंदराव डक यांनी सुंदरराव सोळंके यांचा पराभव केल्यामुळे अल्पावधीत ते जिल्ह्याच्या राजकारणामध्ये चांगलेच चर्चेत आले होते. मतदारसंघाबाहेरचा आमदार म्हणून देशमुखांची ओळख मागच्या 50 वर्षांत माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये बाहेरचा उमेदवार आमदार झाला नव्हता. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून निवडणूक लढलेले आर टी देशमुख हे आमदार झाले. आर टी देशमुख यांची ओळख गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय अशीच आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर आर टी देशमुख हे माजलगावमध्ये राहायला गेले खरे, पण त्यांचं मूळगाव मोहा ते परळी विधानसभा मतदारसंघात येतं. त्यांचे वास्तव्य परळी शहरात असल्यामुळेच आर टी देशमुख हे बाहेरचे आमदार आहेत, अशी चर्चा मागच्या पाच वर्षापासून माजलगाव पंचक्रोशीत ऐकायला मिळते. कॉटन हब असतानाही प्रक्रिया उद्योग आला नाही एकीकडे माजलगाव धरण तर दुसरीकडे गोदावरी नदी ही माजलगाव विधानसभा मतदारसंघाला देणगीच समजली जाते. म्हणूनच ऊसाचं भरघोस उत्पादन आणि त्या खालोखाल कापसाची विक्रमी लागवड या मतदारसंघांमध्ये होते. ऊसासाठी या मतदारसंघांमध्ये तीन साखर कारखाने झाले, मात्र कापसाचे विक्रमी उत्पादन होऊन सुद्धा या भागात एकही मोठा प्रक्रिया उद्योग उभा राहिला नाही. खरंतर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार हे त्या काळामध्ये सत्तेत राहिले, मात्र शेती उत्पादनावर प्रक्रिया उद्योग या मतदारसंघात उभा राहिलाच नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला 17 हजार मताची लीड 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या प्रीतम मुंडे यांना माजलगाव विधानसभा मतदारसंघातून 17000 मताची लीड होती. 1999 नंतर या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद वाढताना पाहायला मिळते. 2014 मध्ये या मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार 38 हजार मतांनी निवडून आला. त्याच विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत भाजप पक्ष आघाडीवर राहिले होता. अगदी सर्वाधिक आमदार राहिलेल्या प्रकाश सोळंके यांना सुद्धा दोन वेळा भाजपकडूनच या मतदारसंघात आमदार होता आलं. भाजपकडून रमेश आडसकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून रमेश आडसकर यांची जोरदार चर्चा आहे. रमेश आडसकर यांचे मूळगाव आडस हे माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या बॉर्डरवर आहे. माजलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट असलेल्या धारुर आणि वडवणी तालुक्यांमध्ये आडसकर यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. यासोबतच मागच्या 15 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत राहिलेल्या अडस्कारांचा या भागात दांडगा जनसंपर्क आहे. 2009 मध्ये रमेश आडसकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती, त्याच आडसकारांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रमेश आडसकर हे पंकजा मुंडे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जातात. भाजपाचे तिकीट कोणाला सस्पेन्स कायम आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाश सोळंके यांचं नाव यापूर्वीच ठरले आहे, मात्र भाजपकडून नेमकं कोणाला तिकीट मिळतं यावर या विधानसभा मतदारसंघातील लढत ठरणार आहे. सध्या तिकीटाच्या शर्यतीमध्ये रमेश आडसकर यांचे नाव सर्वात पुढे आहे. त्यानंतर मोहन जगताप आणि ओमप्रकाश शेटे हेसुद्धा भाजपकडून उमेदवाराची दावेदारी करत आहे. त्यामुळे भाजप माजलगाव विधानसभा मतदारसंघातून कोणाला तिकीट देतं यावरच या विधानसभा मतदारसंघातील लढत ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटकTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget