एक्स्प्लोर

Mahavikas Aghadi Manifesto: प्रत्येक मुलीला 1 लाख रुपये, मासिक पाळीच्या 2 दिवस रजा; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मोठी घोषणा

Mahavikas Aghadi Manifesto: महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासनांची लयलूट करण्यात आली आहे.

Mahavikas Aghadi Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना रविवारी महाविकास आघाडीकडून जाहीरनामा (Mahavikas Aghadi Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला. मविआच्या या जाहीरनाम्याला 'महाराष्ट्रनामा' असे नाव देण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासनांची लयलूट करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार अशी घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने आणि देशाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच गौरव पुन्हा स्थापित करण्यासाठी हा महाराष्ट्रनामा आहे. पाच गॅरंटी आधी जाहीर केलेल्या आहेत. सामाजिक बदलांमध्ये महाराष्ट्र सर्वातआधी आहे. त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक महत्वाची आहे. आताच्या सरकारला सत्तेतून हटवलं तर आम्हाला चांगलं सरकार देता येईल, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. 

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काय काय?

-शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी,नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट
-आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार
-जाती जणगणनना करणार
⁠-300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत
-दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार 
-महिला, लहान मुले-मुली यांच्यासाठी 'निर्भय महाराष्ट्र' धोरण आखणार, तसेच 'शक्ती' कायद्याची अंमलबजावणी करणार
-2.5 लाख नोकरभरती करणार
-शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती
-शेतमालाला हमीभाव देणार,पीकविम्याच्या जाचक अटी काढणार
-सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन
-अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार
-बार्टी,महाज्योती,सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार
-एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार
-महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार
-महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार
-महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करु
-शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार
-सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
⁠-डॉय बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवणार
-महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार 
-बिनाव्याज पाच लाख कर्ज देणार
-कंत्राटी नोकरभरती बंद करणार
-महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेणार
-सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
-शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार
-जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार
-वीजग्राहकांचा विरोध लक्षात घेऊन प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेणार
-युवकांच्या कल्याणासाठी 'युवा आयोगा'ची स्थापना करणार

महाविकास आघाडी पहिल्या 100 दिवसांत काय करणार?

-महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रु.देणार
-महिलांचा बस प्रवास मोफत करणार
-सहा घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांत देणार
-महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार
-जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार

महाविकास आघाडी जाहीरनामा, Video:

संबंधित बातमी:

BJP Maharashtra: भाजपच्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी 'भावांतर' योजना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp MajhaSaif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो समोरABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
वाल्मिक कराडच्या अनुपस्थितीत त्याच कार्यालयात धनंजय मुंडेंचा जनता दरबार
Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
Pune Accident: पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
पुण्यात कंटेनर चालकाने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं; पोलिसांचा वीस किलोमीटर पाठलाग, अपघाताचा थरार CCTV कैद
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
उद्योगपती मोदींकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात सव्वा किलो सोनं अर्पण; सोन्याचा मुकुट बनवणार अंदाजे किंमत किती?
Embed widget