एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआ अन् महायुतीकडून बच्चू कडूंना फोन, निकालापूर्वी पडद्यामागे गुप्त हालचाली! 

Bacchu Kadu : प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना महाविकास आघाडी आणि महायुती सोबत येण्यासंदर्भात फोन आल्याची माहिती पुढे आली आहे.

Maharashtra vidhansabha Election 2024 मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या (Mahayuti) आणि महाविकस आघाडीच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आले आहेत. तर सूत्रांच्या माहितीनुसार, एक्झिट पोलचे निकाल (Maharashtra Exit Poll 2024) समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखल्याची माहिती समोर आली आहे. असे असताना राज्याच्या राजकारणातील इतर लहान पक्षांना आपल्या कडे वळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात असल्याची चर्चा होत असताना बच्चू कडू यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे.   

परिवर्तन महाशक्तीचे (Parivartan Mahashakti) घटक असलेले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना महाविकास आघाडी आणि महायुती सोबत येण्यासंदर्भात फोन आल्याची माहिती पुढे आली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: फोनद्वारे या बाबत माहिती दिली आहे. उद्या निकाल लागल्यावर आम्ही पुढील निर्णय घेणार असल्याचं ही बच्चू कडू यावेळी म्हणाले. बच्चू कडू हे सध्या मुंबईतच आहे. त्यामुळे ते नेमकी काय भूमिका घेतात आणि ते मविआ की महायुतीची साथ देतात, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.  

शरद पवार यांच्या पक्षाची ऑनलाईन बैठक

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची ऑनलाइन बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन केलं आहे. बैठकीत विधानसभा क्षेत्रात किती मतदान झालं? हरकती कशा प्रकारे नोंदवायला हव्यात? मतमोजणी संपताना सी-17 फॉर्मवरील माहिती काय होती आणि मतमोजणी वेळी आपल्या समोर काय माहिती मांडली जात आहे, हे तपासण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. या बैठकीत महाविकास आघाडी 157 जागांपर्यंत जाऊ शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. असे असले तरी प्रत्यक्ष निकाल काय लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचीही बैठक

मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवक्त्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीचं ठिकाण अद्याप निश्चित झालेलं नाही. निकालाच्या दिवशी प्रवक्त्यांनी कशा पद्धतीने पक्षाची भूमिका मांडावी? यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पक्षाच्या प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा :

Vidhansabha Election Result 2024 : पडद्यामागे गुप्त हालचाली, मविआतील एक पक्ष फुटणार; अजितदादांच्या खास व्यक्तीचा खळबळजनक दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Speech Dharashiv : माझ्याही वडिलांची हत्या झाली होती.. आक्रोश मोर्चातील भावनिक भाषणSuresh Dhas Speech Dharashiv| वाल्या काका दीड नाही 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचं आक्रमक भाषण!Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUTABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 11 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Suresh Dhas : हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, प्रकाश शेडगेंना सुद्धा वडिलांची आठवण करून देत सुरेश धसांचा हल्लाबोल!
हाके साहेब पाया पडतो, कुणाची पण उचल घेऊन कुणीकडेही बोलत जाऊ नका, सुरेश धसांचा सडकून प्रहार
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
...तर हा मोक्का आम्हाला मान्य नाही, राज्य बंद पाडू; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
संतोष देशमुखांची दीड कोटीसाठी हत्या, वाल्याकाका दीड नाहीतर 3 कोटी दिले असते, सुरेश धसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Embed widget