एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Voting Percentage : राज्यात दुपारी 3 पर्यंत चुरशीने मतदान, गडचिरोलीत सर्वाधिक 63 टक्के तर ठाणे-मुंबईत सर्वात कमी मतदान
Maharashtra Voting Percentage : राज्यातील कोल्हापूर, नंदूरबार, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचं दिसून आलं. ठाण्यामध्ये सर्वात कमी 38.94 टक्के मतदान झालं.
मुंबई : राज्यात चुरशीने मतदान सुरू असून दुपारी तीन वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. राज्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान झालं असून अनेक ठिकाणी मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याचं दिसून येतंय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत सर्वाधिक म्हणजे 62.99 टक्के मतदान झालं आहे. तर ठाण्यामध्ये सर्वात कमी म्हणजे 38.94 तर मुंबई शहरात 39.34 टक्के मतदान झालं.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 32.18 टक्के मतदान झालं होतं. आता 3 वाजेपर्यंत 45.53 टक्के मतदान झालं आहे. मतदानासाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत वेळ असून अनेक मतदानकेंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्याचं चित्र आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
- अहमदनगर - ४७.८५ टक्के,
- अकोला - ४४.४५ टक्के,
- अमरावती -४५.१३ टक्के,
- औरंगाबाद- ४७.०५टक्के,
- बीड - ४६.१५ टक्के,
- भंडारा- ५१.३२ टक्के,
- बुलढाणा-४७.४८ टक्के,
- चंद्रपूर- ४९.८७ टक्के,
- धुळे - ४७.६२ टक्के,
- गडचिरोली-६२.९९ टक्के,
- गोंदिया -५३.८८ टक्के,
- हिंगोली - ४९.६४टक्के,
- जळगाव - ४०.६२ टक्के,
- जालना- ५०.१४ टक्के,
- कोल्हापूर- ५४.०६ टक्के,
- लातूर _ ४८.३४ टक्के,
- मुंबई शहर- ३९.३४ टक्के,
- मुंबई उपनगर-४०.८९ टक्के,
- नागपूर - ४४.४५ टक्के,
- नांदेड - ४२.८७ टक्के,
- नंदुरबार- ५१.१६ टक्के,
- नाशिक -४६.८६ टक्के,
- उस्मानाबाद- ४५.८१ टक्के,
- पालघर- ४६.८२ टक्के,
- परभणी- ४८.८४ टक्के,
- पुणे - ४१.७० टक्के,
- रायगड - ४८.१३ टक्के,
- रत्नागिरी- ५०.०४टक्के,
- सांगली - ४८.३९ टक्के,
- सातारा - ४९.८२टक्के,
- सिंधुदुर्ग - ५१.०५ टक्के,
- सोलापूर -४३.४९ टक्के,
- ठाणे - ३८.९४ टक्के,
- वर्धा - ४९.६८ टक्के,
- वाशिम -४३.६७ टक्के,
- यवतमाळ - ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.
ही बातमी वाचा:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement