एक्स्प्लोर

Radhanagari Vidhan Sabha : राधानगरी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा प्रकाश आबिटकरांची हॅट्ट्रिक; ठाकरेंनी बंटी पाटलाकंडे जबाबदारी देऊनही केपींची मशाल धगधगली नाहीच!

केपी पाटील यांचे मेहुणे ए वाय पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचा कोणाला फटका बसणार? याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांच्या बंडखोरीचा प्रभाव या दोघांवर झालेला दिसून येत नाही.

Radhanagari Vidhan Sabha : राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रकाश आबिटकर यांनी हॅट्ट्रिक केली आहे. पहिल्यांदाच या मतदारसंघातून एखाद्या आमदाराने हॅट्रिक करण्याची किमया केली आहे. माजी आमदार के पी पाटील यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागलं आहे. प्रकाश आबिटकर शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून केपी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पाटील आणि प्रकाश आबिटकर यांच्यामध्ये पुन्हा एकदा सामना रंगला होता. यापूर्वी झालेल्या बद्री साखर कारखाने निवडणुकीमध्ये केपी पाटील आणि प्रकाश आबिटकर आमने सामने आले होते. मात्र, के पी पाटील यांनी एकहाती कारखाना कारखान्याची निवडणूक जिंकली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये कोण कोणाचा काटा काढणार? याकडे लक्ष होते. मात्र, प्रकाश आंबिटकर यांनी आमदारकीमध्ये बाजी मारली आहे. 

राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये

या मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रचाराची पहिली सभा घेतली होती. गद्दाराला पराभूत करा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र, प्रकाश आंबिटकर विजयी होण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत. आबिटकर यांची मतदारसंघातील विकास कामे त्यांच्यासाठी निर्णय ठरली आहेत. या मतदारसंघांमध्ये केपी पाटील यांचे मेहुणे ए वाय पाटील यांनी सुद्धा बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांच्या बंडखोरीचा कोणाला फटका बसणार? याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यांच्या बंडखोरीचा फारसा प्रभाव या दोघांवर झालेला दिसून येत नाही. प्रकाश आबिटकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत तिसऱ्यांदा आमदारकी पटकावली आहे. राज्यात महायुती सत्तेत असल्याने आबिटकर मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या प्रचार दौऱ्यामध्ये याबाबत सुतवत केले होते. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राजेश क्षीरसागर यांनी राजेश लाटकर यांच्या विरोधात विजय खेचून आणला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून प्रकाश आबिटकर आणि प्रकाश आबिटकर मंत्रीपदाच्या शर्यतीत असणार आहेत. 

केपी पाटलांची जबाबदारी सतेज पाटलांकडे 

दिवाळी पार पडताच उद्धव ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेत कोल्हापुरात प्रचाराचा नारळ फोडला होता. आदमापुरात झालेल्या विराट सभेत उद्धव ठाकरे यांनी केपी पाटील यांच्या विजयाची जबाबदारी जाहीरपणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या खांद्यावर दिली होती. माजी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी सुद्धा काँग्रेस प्रवेश केला होता. त्यामुळे गटातटाचे राजकारण पाहता आणि सतेज पाटलांची निर्णायक ताकद पाहता केपी पाटील पुन्हा एकदा गड काबीज करतील, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आबिटकर यांनी विकासकामे आणि केपींच्या दलबदलू भूमिकेला छेद विजय खेचून आणला आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Embed widget