सुनील टिंगरेंनी जर नोटीस पाठवली असेल तर ती महाराष्ट्रासमोर जाहीर करा, सुप्रिया सुळेंच्या टीकेला रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर
खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Rupali Chakankar on Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी वडगाव शेरी (Vadgaon Sheri) येथे प्रचारसभेत एक विधान केले की, सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी पवारसाहेबांना नोटीस पाठवली. पण या विधानामध्ये काहीही तथ्य नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केलं आहे. जर नोटीस पाठवली असेल तर ती महाराष्ट्रासमोर जाहीर करावी. तसेच ज्या उमेदवाराला तुतारी गटाने उमेदवारी दिली आहे, ते बापू पठारे यांच्यावर त्यांच्याच सुनेने विनयभंग, शारीरिक व मानसिक अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. सुप्रिया सुळे हाच का तुमचा महिला सन्मान? असा सवाल करत चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
पुण्यात मे महिन्यामध्ये झालेल्या कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताप्रकरणात नाव घेऊन बदनामी केली तर कोर्टात खेचीन, अशी नोटीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना पाठवली असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. त्या नोटिसवर सुप्रिया सुळे यांनी, ज्या शरद पवार साहेबांनी मागील निवडणुकीकरता एबी फॉर्मवर सही करून सुनील टिंगरे यांच्या हातात फॉर्म दिला. त्यांनीच शरद पवारांच्या नोटीस पाठवली आहे, असं म्हणत हल्लाबोल केला. त्यावरती मी नोटीस पाठवली नसल्याचं आमदार सुनील टिंगरे यांनी म्हटलं. त्यावरून आता ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.
नोटीसवरती शरद पवारांचं नाव
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सुनील टिंगरे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना ही नोटीस पाठवली होती असं त्यांनी म्हटलं होतं, मी शरद पवारांना नाही तर पक्षाला नोटीस पाठवली होती, असं त्यांनी म्हटलेलं होतं मात्र, या नोटीसवरती शरद पवारांचं नाव लिहण्यात आलेलं आहे. पोर्शे प्रकरणात बदनामी करू नये, अशी नोटीस त्यांनी दिलेली होती. त्यांनी ती नोटीस शरद पवारांना पाठवल्याचं समोर आलं आहे. या नोटीसीमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं जर आपली बदनामी करण्यात आली तर आपण फौजदारी कारवाई करू आणि ही नोटीस पक्षप्रमुख या नात्याने शरद पवार यांना मिळाली त्यांच्या पक्ष कार्यालयात ही नोटीस देण्यात आली होती त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्याच्या प्रचारावेळी या मुद्द्याला हात घातला.
महत्वाच्या बातम्या: