Sunil Tingre: 'टिंगरेंनी शरद पवारांना पाठवलेली नोटीस सुळेंनी महाराष्ट्राला दाखवावी'! राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य, म्हणाले, 'सहानुभूतीसाठी ताई...'
Sunil Tingre: राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी सोशल मिडियावर पोस्ट करत सुप्रिया सुळेंना आव्हान दिलं आहे.
पुणे: पुण्यात मे महिन्यामध्ये झालेल्या कल्याणीनगर पोर्शे कार अपघाताप्रकरणात नाव घेऊन बदनामी केली तर कोर्टात खेचीन, अशी नोटीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शरद पवार यांना पाठवली असल्याचं सुप्रिया सुळेंनी (शुक्रवारी) म्हटलं आहे. त्या नोटिसवर सुप्रिया सुळे यांनी, ज्या शरद पवार साहेबांनी मागील निवडणुकीकरता एबी फॉर्मवर सही करून सुनील टिंगरे यांच्या हातात फॉर्म दिला. त्यांनीच शरद पवारांच्या नोटीस पाठवली आहे, असं म्हणत हल्लाबोल केला. त्यावरती मी नोटीस पाठवली नसल्याचं आमदार सुनील टिंगरे यांनी म्हटलं. त्यावरून आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत सुप्रिया सुळेंना आव्हान दिलं आहे.
आमदार सुनील टिंगरे यांनी पाठवलेली नोटिस सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्राला दाखवावी. सहानुभूती साठी ताईचा खटाटोप चालू आहे, ताई तुमच्या उमेदवारांवर स्वतःच्या सुनेने विनयभंग, मारहाण सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत. ताई तुम्ही तुमच्या उमेदवाराकडून "महिला सन्मानाचा" शब्द घ्यायला पाहिजे होता. विनयभंग, छळ करणाऱ्याला उमेदवारी देणं हे तुमचं महिला सन्मान धोरण आहे का? असा सवाल देखील आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
नेमकं काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?
"वडगाव शेरीचे आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी पवार साहेबांना नोटीस पाठवली, म्हणून सुप्रिया ताई सुळे खोटं सांगतायत. सहानुभूतीसाठी ताईचा खटाटोप चालू आहे. साहेबांना काय नोटीस पाठवली हे ताईने महाराष्ट्राला दाखवावं. सुप्रिया ताई काल आपण वडगाव शेरी मधे भाषण करताना तुतारीचे उमेदवार बापू पठारे यांच्याकडून शब्द घेतला पोलीस स्टेशनला जाण्याऐवजी दवाखान्यात जाल म्हणून...ताई तुमच्या उमेदवारांवर स्वतःच्या सुनेने विनयभंग,मारहाण सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत. ताई तुम्ही तुमच्या उमेदवाराकडून "महिला सन्मानाचा" शब्द घ्यायला पाहिजे होता.विनयभंग,छळ करणाऱ्याला उमेदवारी देणं हे तुमचं महिला सन्मान धोरण आहे का?", अशी पोस्ट सूरज चव्हाण यांनी लिहली आहे.
वडगाव शेरीचे आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी पवार साहेबांना नोटीस पाठवली म्हणून सुप्रिया ताई सुळे खोटं सांगतायत..सहानुभूती साठी ताईची खटाटोप चालू आहे. साहेबांना काय नोटीस पाठवली हे ताईने महाराष्ट्राला दाखवावं.
— Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) (@surajvchavan) November 10, 2024
सुप्रिया ताई काल आपण वडगाव शेरी मधे भाषण करताना तुतारीचे उमेदवार बापू…
टिंगरेंनी पाठवलेली नोटीस एबीपी माझाच्या हाती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सुनील टिंगरे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना ही नोटीस पाठवली होती असं त्यांनी म्हटलं होतं, मी शरद पवारांना नाही तर पक्षाला नोटीस पाठवली होती, असं त्यांनी म्हटलेलं होतं मात्र, या नोटीसवरती शरद पवारांचं नाव लिहण्यात आलेलं आहे. पोर्शे प्रकरणात बदनामी करू नये, अशी नोटीस त्यांनी दिलेली होती. त्यांनी ती नोटीस शरद पवारांना पाठवल्याचं समोर आलं आहे.
या नोटीसीमध्ये असं नमूद करण्यात आलं होतं जर आपली बदनामी करण्यात आली तर आपण फौजदारी कारवाई करू आणि ही नोटीस पक्षप्रमुख या नात्याने शरद पवार यांना मिळाली त्यांच्या पक्ष कार्यालयात ही नोटीस देण्यात आली होती त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्याच्या प्रचारावेळी या मुद्द्याला हात घातला.