![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, भाजप आमदार विजयकुमार देशमुखांनी व्यक्त केली इच्छा
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे कुशल आणि अनुभवी आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा सोलापूर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांनी व्यक्त केली आहे.
![देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, भाजप आमदार विजयकुमार देशमुखांनी व्यक्त केली इच्छा Maharashtra Vidhansabha election result 2024 Devendra Fadnavis should be the Chief Minister of the state BJP MLA Vijaykumar Deshmukh expressed his wish देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, भाजप आमदार विजयकुमार देशमुखांनी व्यक्त केली इच्छा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/24/feb5f0d0ccd2fd0bdb449b1ca6bc62d21732448141043339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Vijaykumar Deshmukh : राज्यात महायुतीला प्रचंड मोठं यश मिळालं आहे. एकूण 236 जागा महायुतीला मिळाल्या आहे. यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे कुशल आणि अनुभवी आहेत. महायुतीच्या सरकारमध्ये फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा सोलापूर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांनी व्यक्त केली आहे. विजयकुमार देशमुख हे तब्बल 5 वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
मंत्री पदासाठी अद्याप पक्षश्रेष्ठींकडून कुठलाही निरोप नाही
सलग पाचव्यांदा आमदारकी मिळवणाऱ्या विजयकुमार देशमुख यांच्या गंगा निवासस्थानी सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मतदारसंघातील कार्यकर्ते येत आहेत. पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल विजयकुमार देशमुख यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान, मंत्री पदासाठी अद्याप पक्षश्रेष्ठींकडून कुठलाही निरोप नसल्याचे देशमुख म्हणाले. आयुष्यभर भाजप कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा यावेळी देशमुख यांनी व्यक्त केली.
राज्याचा आगामी मुख्यमंत्री कोण?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024 Result) निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दरम्यान, निकालानंतर आता राज्याचा आगामी मुख्यमंत्री कोण? असं विचारलं जात आहे. त्यासाठी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रिपद शिंदे यांच्याकडेच राहावे, अशी मागणी केली आहे. तर भाजपाच्या नेत्यांनीही फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे राज्याचे नेतृत्त्व सोपवले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे.
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबईतील वानखेडे मैदानावर होण्याची शक्यता
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मुंबईतील वानखेडे मैदानावर शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाजी पार्क मैदान मिळवताना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे शपथविधी वानखेडेवरच होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात आहेत. दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रिपद आमच्याकडेच राहावे असे वाटत आहे. त्यामुळे याबाबत नेमका काय निर्णय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असी इच्छा व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
नव्या मुख्यमंत्र्याच्या नावावर शिक्कामोर्तब कसं होणार? शिंदेंच्या शिलेदाराने नेमकं सांगितलं; दीपक केसरकरांनी सस्पेन्स संपवला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)