मनोज जरांगे सांगतील तोच उमेदवार, इतर उमेदवार अर्ज मागे घेणार, इच्छुक उमेदवारांनी दिले शपथपत्र
धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील मराठा उमेदवारांकडून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना शपथपत्र देण्यात आलं आहे. जरांगे पाटील ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील तो उमेदवार कायम राहणार आहे.
Maharashtra Vidhansabha Election Dharashiv News : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील मराठा उमेदवारांकडून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना शपथपत्र देण्यात आलं आहे. जरांगे पाटील ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील तो उमेदवार कायम राहणार आहे. इतर उमेदवार अर्ज पाठीमागे घेणार आहेत. मराठा समाजातील सर्व इच्छुक उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
मराठा उमेदवारांची शपथपत्र अंतरवाली सराटीला पाठवण्यात आली आहेत. धाराशीव विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे पाटील समर्थक उमेदवारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्मय घेण्यात आला आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील उमेदवारीबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे जो उमेदवार देतील त्याला सर्वांचा पाठिंबा असणार आहे. इतर उमेदवार उमेदवारी अर्ज परत घेणार आहेत.
आज उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
आम्ही उमेदवारीवर भांडणार नाही. आम्ही सगळ्यांना मोकळे सोडणार आहोत. पण आम्हाला त्रास देणाऱ्यांना मात्र सोडणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. येत्या 3 तारखेला भूमिका जाहीर करणार आहे. 3 तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली.आम्ही धोक्यात आहोत तर मग हे हिंदू का म्हणत नाहीत की गरीब मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. एकमेकांच्या धर्मात हस्तक्षेप करणार नाही. मी कट्टर हिंदू आहे. आम्ही सत्ता परिवर्तन करणार आहोत असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आले असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आम्ही लोकशाही मार्गाने पुढे जात आहोत. कोणीही दादागिरी करणार नाही असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. जे नाव सांगेल त्यांनीच उमेदवारी ठेवायची, बाकीच्यांनी अर्ज काढून घ्यायचे असेही मनोज जरांगे म्हणाले. लोकशाही मार्दाने लढा, आपल्या जागा सगळ्या ठिकाणी निवडून येतील असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. आपला समाज राजकीय लोकांच्या गुंडगिरीतून बाहेर काढला असल्याचे जरांगे म्हणाले. तुम्ही मराठ्यांना, धनगरांना, मुस्लिमांना, दलितांना काय दिलं आहे असा सवालही मनोज जरांगे यांनी केला. मी कट्टर हिंदू आहे. आम्ही सत्ता परिवर्तन करणार आहोत असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आले असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या: