काँग्रेसमधील बंडखोरांवर आज कारवाई होणार, नाना पटोलेंची माहिती, म्हणाले ,नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्राला ATM बनवून लुटलं
काँग्रेसमध्ये (Congress) ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्या सर्व उमेदवारांवर कारवाई होणार असल्याचे माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.
Nana Patole : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच (Mahavikas Aghadi) बंडखोरी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. अशातच काँग्रेसमध्ये (Congress) ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्या सर्व उमेदवारांवर कारवाई होणार असल्याचे माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच कोल्हापूर उत्तरमध्ये आम्ही राजेश लाटकर यांना पाठिंबा दिल्याचे नाना पटोले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्राला एटीएम बनवून ठेवलं
विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज भोकर मतदारसंघासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सभा झाली. त्यानंतर ते बोलत होते. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये सभा होणार आहे. पटोले यांची पहिली सभा झाली ती अशोक चव्हाण यांच्या गडात अर्थातच भोकर मतदारसंघातील मुदखेड या ठिकाणी. त्यानंतर एबीपी माझाशी बोलताना नाना पटोले यांनी शरद पवार यांच्या भेटी संदर्भात भाष्य केले आहे. महाराष्ट्रात आम्ही अनेक जागा जिंकणार आहोत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा पटोले यांनी केला. भाजपने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र घाण ठेवण्याची परंपरा सुरू केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्राला एटीएम बनवून लुटण्याचे काम सुरू केल्याचं नाना पटोले म्हणाले.काँग्रेसमधील बंडखोरांवर आज कारवाई होणार आहे. तसेच कोल्हापूर उत्तर मध्ये आम्ही राजेश लाटकर यांना पाठिंबा दिल्याचे देखील ते म्हणाले.
'या' बंडखोरांवर केली कारवाई
ज्या कांग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक (Rajendra Mulak), काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार (Yajnavalkya Jichkar), पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल (Aaba Bagul) आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे (Kamal Vyavhare) यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. तर सांगली विधानसभेसाठी काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर नाराज झालेल्या वसंतदादा गटाने जयश्री पाटील (Jayshree Patil) यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्याला आता खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी जाहीर पाठिंबा दिला. आता जयश्री पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे
महत्वाच्या बातम्या: