एक्स्प्लोर

Maharashtra Vidhansabha Election : भाजपचे 12 नेते शिंदेंच्या धनुष्यबाणावर मैदानात उतरले, तर 5 जण अजितदादांचं घड्याळ घेऊन लढणार

Maharashtra Vidhansabha Election : अनेक भाजप नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी मिळवली आहे.

Maharashtra Vidhansabha Election : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षात अनपेक्षित घटनाक्रम पाहायला मिळाले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. निवडणूक एकतर्फी होणार असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जोरदार प्रचार करत निवडणुकीला निर्णायक मतं वळवली होती. 2019 मध्येही अनेकांनी वेगवेगळ्या पक्षात उड्या घेतल्या होत्या. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळाची परिस्थिती आहे. अगदी एखादा नेता रातोरात दुसऱ्या पक्षात प्रवेश करुन तिकीट मिळवताना दिसतोय. शिवाय, दुसऱ्या पक्षातून आलेल्या आयारामांना तिकीटही दिले जात आहे. याशिवाय महाविकास आघाडी आणि महायुती एकत्रितपणे लढत असताना देखील त्यांनी काही ठिकाणी एकमेकांविरोधात उमेदवार दिले आहेत. 

भाजपचे 12 दिग्गज नेते शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभा लढणार

माजी केंद्रीय मंत्री नाराणय राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करुन निवडणुकीला सामोरे जात आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने निलेश राणे यांना कुडाळ-मालवणमधून उमेदवारी दिली आहे. 

भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

भाजप नेते राजेंद्र गावीत हे देखील शिंदेंच्या सेनेत दाखल झाले असून ते पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

विलास तरे यांनी देखील विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय. यापूर्वी ते भाजपमध्ये होते. आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत बोईसरमधून विधानसभा लढण्याचा निर्णय घेतलाय.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी संतोष शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी भाजपमधून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

अंधेरीतील दिग्गज नेते मुरजी पटेल भाजपमध्ये अनेक वर्ष काम करत होते. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ते अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. 

अमोल खताळ संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. संगमनेरमधून निवडणूक लढण्यास सुजय विखे आग्रही होते. मात्र, ऐनवेळी त्यांचं तिकीट कापण्यात आले. अमोल खताळ यांनी देखील भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केलाय. 

शायना एन सी या देखील भाजपमध्ये होत्या. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना मुंबादेवीमधून निवडणूक लढणार आहेत. 

अजित पिंगळे यांनी भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केला, त्यांना धाराशिवमधून उमेदवारी देण्यात आली. 

करमाळा विधानसभा मतदारसंघात दिग्वीजय बागल यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी जवळपास 6 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

नेवासामध्ये विठ्ठल लंघे यांना नेवासामधून शिंदेंनी उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी ते देखील भाजपमध्ये कार्यरत होते. 

बळीराम शिरसकर यांना ठाकरेंच्या नितीन देशमुख यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी बळीराम शिरसकर भाजपमध्ये होते. 

भाजपमधून आलेल्या नेत्यांना अजित पवारांचं तिकीट 

1. राजकुमार बडोले
2.प्रताप पाटील चिखलीकर 
3. निशिकांत पाटील
4.संजय काका पाटील 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Smita Patil : 'अजितदादांमध्ये आम्ही आबांना पाहतो, रोहित पाटलांविरोधात प्रचार करावा पण...' आर आर पाटलांच्या कन्येचं आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
Amit Thackeray: दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट
दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट
Ajit Pawar: पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 31 OCT 2024 : 06 PM  : TOP Headlines : एबीपी माझा हेडलाईन्सShrinivas Vanga : मित्रांनी मला खूप सांभाळलं;म्हणून मी सुखरूप घरी परतलोVijay Shivtare : शिवसेनेच्या विजय शिवतारेंविरोधात राष्ट्रवादीच संभाजी झेंडे मैदानातTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 31 OCT 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
राहुल गांधी दिवाळी होताच मुंबईत प्रचाराचा नारळ फोडणार, शरद पवार अन् उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार
Amit Thackeray: दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट
दीपोत्सव मनसेचा, अमित ठाकरेंच्या उपस्थितीला आक्षेप; ठाकरेंच्या उमेदवाराने दाखवलं बोट
Ajit Pawar: पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा; पुत्र सुजात यांनी दिली तब्येतीची माहिती
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा; पुत्र सुजात यांनी दिली तब्येतीची माहिती
Nana Kate: अजितदादांच्या मनधरणीनंतर ही नाना काटे बंडखोरीवर ठाम; म्हणाले 'उमेदवारी मागे घेण्याबाबत...'
अजितदादांच्या मनधरणीनंतर ही नाना काटे बंडखोरीवर ठाम; म्हणाले 'उमेदवारी मागे घेण्याबाबत...'
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : दिंडोरीत नरहरी झिरवाळ विजयाची हॅट्ट्रीक करणार? की मविआ धक्का देणार?
विधानसभेची खडाजंगी : दिंडोरीत नरहरी झिरवाळ विजयाची हॅट्ट्रीक करणार? की मविआ धक्का देणार?
देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं; मनोज जरांगेंचं ठरलं, गणित जुळलं, सांगितला विजयाचा फॉर्म्युला
देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं; मनोज जरांगेंचं ठरलं, गणित जुळलं, सांगितला विजयाचा फॉर्म्युला
Embed widget