Maharashtra Exit Polls Result 2024 Live : लोकशाही रुद्रच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला 142 तर मविआला 140 जागा मिळण्याची शक्यता
Maharashtra Election Exit Polls Results 2024 Live : राज्याच्या जनतेचा कौल कुणाला, एक्झिट पोलमध्ये निकाल काय? जाणून घ्या सर्व अपडेट्स

Background
मुंबई : गेल्या अनेक दिवासंपासून राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार केला जात होता. आज (20 नोव्हेंबर) या निवडणकुसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. राज्यातील जनतेने उत्स्फूर्तपणे या निवडणुकीसाठी मतदान केले. या मतदानादरम्यान, राज्यातील काही ठिकाणी अनुचित प्रखार घडल्याच्या घटना झाला. छत्रपती संभाजीनगर, बीड अशा काही जिल्ह्यांत तर वाद-विवादाच्या काही घटना घडल्या. नाशिकमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यातही वाद झाला. अशा काही घटना वगळता राज्यात इतरत्र मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली.
एकूण 1 लाख 427 मतदान केंद्रांवर मतदान
राज्यात आज सकाली सात वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ होती. निवडणूक आयोगाने संपूर्ण राज्यभर मतदानासाठी मतदान केंद्र उभे केले होते. राज्यात ठिकठिकाणी एकूण 1 लाख 427 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. मुंबईत एकूण 2538 मतदान केंद्रांवर मतदान झाले.
Maharashtra Regionwise Seats : प्रदेशनिहाय जागा खालीलप्रमाणे,
- पश्चिम महाराष्ट्र - 70 जागा
- विदर्भ - 62
- मराठवाडा - 46
- कोकण ठाणे - 39
- मुंबई - 36
- उत्तर महाराष्ट्र - 35
दरम्यान, आता मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांने केलेले एक्झिप पोलचे अंदाज समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या माध्यमातून धक्कादायक अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Result Live Updates : लोकशाही रुद्रच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीला 142 तर मविआला 140 जागा मिळण्याची शक्यता
लोकशाही रुद्रच्या एक्झिट पोलनुसार राज्यात कोणलाा किती जागा?
महायुती - 128-142
भाजप - 80-85
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-22
महाविकास आघाडी - 125-140
काँग्रेस- 48-55
शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 38-42
इतर - 18-23
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Result Live Updates : ZEE AI POLL च्या अंदाजानुसार राज्यात महायुती ठरणार सरस
ZEE AI POLL च्या अंदाजानुसार राज्यात कोणाला किती जागा
एकूण महाराष्ट्र
महायुती 114-139
मविआ 105-134
इतर 0-8
मराठवाडा (एकूण जागा 46 )
महायुती 16-21
मविआ 24-29
इतर 0-2
विदर्भ (एकूण जागा 62 )
महायुती 32-37
मविआ 24-29
इतर 0-2


















