Eknath Shinde: 'राज ठाकरेंना बोललो, मात्र त्यांनी...', अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं नेमकं कारण
Eknath Shinde: अमित ठाकरेंविरोधात शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर उभे आहेत. माहिमच्या जागेचा तिढा सुटणार का, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

Eknath Shinde: निवडणुका काही दिवसांवर आल्या असतानाच काही मतदारसंघात घमासान सुरू असल्याचं दिसून येत आहे. चार तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्यामुळे अनेक ठिकाणी घडामोडींना वेग आला आहे. तर काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मुंबईतील माहिम मतदारसंघ चर्चेत आहे. माहिम मतदारसंघातून पहिल्यांदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर, अमित ठाकरेंविरोधात शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर उभे आहेत. माहिमच्या जागेचा तिढा सुटणार का, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणालेत एकनाथ शिंदे?
राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहीममधून निवडणूक लढवणार असल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, "राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत आमच्यासोबत होते, त्यांनी लोकसभा निवडणुकीला आम्हाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांची रणनीती काय आहे याबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली होती, तेव्हा ते म्हणाले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप तुम्ही लढा, त्यानंतर आपण बोलूयात. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले. माहीममधून आमचे गेल्या ३ ते ४ टर्म पासून आमदार आहे, ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. ते तिथले आमदार आहेत, त्यांच्याशी देखील मी चर्चा केली. मात्र माहिममधील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आक्रमक आहेत. त्यांना निवडणूक लढायची आहे. कार्यकर्त्यांतकडे देखील आम्हाला लक्ष द्यावं लागेल. कार्यकर्त्यांचे मनोबल खचून जाता कामा नये. ते देखील त्या पक्षाच्या नेत्यांचं काम आहे. त्या दिवसापासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची युती आहे, त्यात अंतर्गत आम्ही निवडणूक लढत आहोत, आमच्यासोबत रामदास आठवले आहेत, जन सुराज्य पक्ष आहे, आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकू. आम्ही बहुमताने जिंकू असा विश्वास देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ते एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.
#WATCH | Thane: On Raj Thackeray's son Amit Thackeray contesting from Mahim, Maharashtra CM Eknath Shinde says, "He (Raj Thackeray) was with us in the Lok Sabha elections. I had a conversation with him as to what is his strategy, and he said to let Shiv Sena, BJP and NCP decide… pic.twitter.com/BLMZ4mk7uW
— ANI (@ANI) November 2, 2024
राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी भाजपने आपली भूमिका जाहीर केली आहे. मात्र सदा सरवणकर उमेदवारी माघार घेणार नाहीत, आपण कोणत्याही परिस्थितीत लढणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.
मी निवडणूक लढवणारच : सदा सरवणकर
माहीम विधानसभेतून सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याबाबत विचारले असता सदा सरवणकर म्हणाले की, मी माघार घेण्याचा प्रश्न नाही. महायुतीमध्ये मनसे नाही. मी एकटे पडलो नाही. मला जनतेचे आशिर्वाद आहे. मी ठासून आणि ठामपणे सांगतो मी निवडणूक लढवणार आहे आणि जिंकून येणार आहे. ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मी कार्यकर्त्यांच्या इच्छेसाठी निवडणूक लढवत आहे आणि निवडून येणार. जनता माझ्यासोबत आहे. मतदारांनी ही लढत एकतर्फी करायचे ठरवले आहे. आपल्याला 365 दिवस भेटणारा माणूस सहज आणि सेवेला




















