(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shahu Maharaj : मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
Shahu Maharaj : राज्यात किती जागा येणार हे सांगण्यास मी काय ज्योतिषी नाही. त्यामुळे किती जागा येणार याबद्दल मी सांगू शकत नाही. पण सगळं चांगलं होईल यात काय प्रश्न नाही, असेही ते म्हणाले.
कोल्हापूर : प्रश्न चेहऱ्याचा नाही तर व्यक्तीचा आहे. चांगली व्यक्ती दिल्यास चांगलं काम होईल. टक्केवारीकडे लक्ष न देता जो काम करेल त्याचं शहराच्या विकासासाठी चांगलं काम होईल, अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीवरून चांगलंच राजकीय घामासान सुरू आहे. कोल्हापूर उत्तरची उमेदवारी कोणाला मिळणार इथपासून सुरू झालेला प्रवास ते जाहीर केलेला उमेदवाराची रद्द झालेली उमेदवारी आणि मधुरिमाराजे छत्रपती यांना मिळालेली उमेदवारी यामुळे कोल्हापूर उत्तरचं राजकारण ढवळून निघालं आहे.
राज्यात किती जागा येणार हे सांगण्यास मी काय ज्योतिषी नाही. त्यामुळे किती जागा येणार याबद्दल मी सांगू शकत नाही. पण सगळं चांगलं होईल यात काय प्रश्न नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ हा कोल्हापुरातून होतो, त्यामुळेच आपल्या जिल्ह्याचे महत्व महारष्ट्राला कळालं असल्याचे शाहू महाराज यांनी सांगितले.
काही गोष्टींमुळे उमेदवारी नाकारावी लागली
या सर्व पार्श्वभूमीवर आज खासदार शाहू महाराजांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आणि भूमिका स्पष्ट केली. शाहू महाराजांनी सांगितले की, जयश्री जाधव या ठिकाणी आल्या होत्या, पक्षाच्या वरिष्ठांची देखील त्यांचे बोलणे झाले असेल. त्या विद्यमान आमदार होत्या त्यामुळे त्यांचे तिकीट नाकारला असेल तर त्या नाराज असणार त्यात शंका नाही. ते पुढे म्हणाले की, राजेश लाटकर यांच्याशी पक्षाचं बोलणं सुरू आहे. मी स्वतः त्यांच्याशी बोललो नाही, पण आवश्यकता वाटली तर मी स्वतः त्याच्याशी बोलेन. त्यांची नाराजी दूर करू. ते महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे घटक आहेत. ते नाराज होणं स्वाभाविक आहे. एखाद्याला उमेदवारी घोषित झाली तर त्याला दिली पाहिजे. पण काही गोष्टी अशा घडल्या, ज्यामुळे त्यांची उमेदवारी पक्षश्रेष्ठीना नाकारावी लागली.
राजघराण्यातील व्यक्तीवर काय म्हणाले
शाहू महाराज यांनी सांगितले की, एका घराण्यातील व्यक्ती राजकारणात असेल तर पुष्कळ झालं, त्या दृष्टीने आमची हालचाली आणि वाटचाल सुरू होती. जनतेचं हित लक्षात घेऊनच आमची वाटचाल सुरू होती. पण जनतेचा रेटा होता. त्यामुळे आम्हाला मधुरीमाराजे छत्रपती यांना निवडणुकीला उतरावे लागले. दरम्यान, आमदार जयश्री जाधव यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, जयश्री जाधव ह्या या ठिकाणी आल्या होत्या, पक्षाच्या वरिष्ठांची देखील त्यांचे बोलणे झाले असेल. त्या विद्यमान आमदार होत्या त्यामुळे त्यांचे तिकीट नाकारला असेल तर त्या नाराज असणार त्यात शंका नाही.
इतर महत्वाच्या बातम्या