एक्स्प्लोर

भोरमध्ये अजित पवारांची मोठी खेळी, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाध्यक्षाला थेट विधानसभेचं तिकीट!

उद्धव ठाकरे यांनी शंकर मांडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. अजित पवार यांनी त्यांना विधानससभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे.

मुबंई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सध्या या निवडणुकीसाठी जागावाटप करण्यात येत आहे. वेगवेगळे पक्ष सक्षम उमेदवाराला तिकीट देत आहेत. अशा स्थितीत वेगवेगळ्या मतदारसंघांमधून नाराजीनाट्यही पाहायला मिळत आहे. जवळपास सर्वच पक्षांत बंडखोरी, राजीनामा असे प्रकार घडताना दिसत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवून भोर आणि खडकवासाला विधानसभआ मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे याच नेत्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तिकीट दिले आहे. 

शिवसेनेने नेमकी काय कारवाई केली? 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शंकर मांडेवकर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली आहे. ते ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख होते.  पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे  शंकर हिरामण मांडेकर यांची शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते विनायक राऊत यांनी दिली आहे. 

शंकर मांडेकर यांना अजितदादांकडून तिकीट 

ठाकरेंच्या शिवसेनेने शंकर मांडेकर यांची हकालपट्टी केली असली तरी  अजित पवार यांच्या पक्षाने त्यांचा मोठा सन्मान केला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 28 ऑक्टोबर रोजी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत एकूण दोन जागांवर उमेदवार देण्यात आले आहे. या यादीत शंकर मांडेकर यांचाही समावेश आहे. अजित पवार यांनी मांडेकर यांना भोर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. म्हणजेच मांडेकर आता भोर जागेवरून घड्याळ या तिकिटावरून निवडणूक लढवणार आहेत. अजित पवार यांनी चौथ्या यादीत देवेंद्र भुयार यांनादेखील तिकीट दिले आहे. भुयार हे मोर्शीतून यंदाची विधानसभा निवडणूक लढवतील.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजदेखील अनेक नेते पक्षबदल, बंडखोरी करण्याची शक्यता आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी आणखी रंगणार आहे. लवकरच राज्यात ठिकठिकाणी सभा, बैठकांचे सत्र चालू होईल. 

हेही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा मोठा गेम! थेट एकनाथ शिंदेंच्या विरोधात दिला उमेदवार, नवव्या यादीत कोणा-कोणाला तिकीट?

Amit Thackeray: राज ठाकरेंचा 'छावा'; माहीमच्या नवनिर्माणाची आस घेऊन पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अमित ठाकरेंची संपत्ती किती?

मोठी बातमी: आयुष्य संपवण्याची भाषा करणारे आमदार श्रीनिवास वनगा कालपासून बेपत्ता, 12 तासांपासन फोन नॉटरिचेबल

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget