प्रियंका गांधींचा स्वागतासाठी लावलेल्या होर्डिंगवरुन संघ मुख्यालय परिसरात तनाव; भाजप कार्यकर्त्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांनाच सवाल
Election 2024 : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज नागपुरात दोन रोड-शो करणार आहेत. दरम्यान, नागपुरातील बडकस चौक परिसरात लावलेल्या होर्डिंगवरुन काहीसा तनाव झाल्याची माहिती पुढे आली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभेच्या मतदानाला आता अवघे 3 दिवस उरले आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवत राजकीय प्रचाराला रंग चढला असून आता प्रचाराला अवघा काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्या अनुषंगाने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आज (रविवार) नागपुरात (Nagpur) एकानंतर एक असे दोन रोड-शो करणार आहेत. दरम्यान, प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी नागपुरातील बडकस चौक परिसरात लावलेल्या होर्डिंगवरुन काहीसा तनाव झाल्याची माहिती पुढे आली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांकडून अनधिकृत होर्डिंग काढायला सुरवात
निवडणूक अधिकाऱ्यांनी बडकस चौक येथील प्रियांका गांधी यांच्या रोड-शोचे अनधिकृत होर्डिंग काढायला केली सुरवात केली आहे. परवानगी नसेल तर आम्ही काँग्रेसचे बॅनर काढू, असा आक्रमक पवित्रा निवडणूक अधिकाऱ्यासमोत भाजप कार्यकर्त्यांनी घेतला आहे. तसेच परवानगी नसताना हे बॅनर लावण्यात आले आहे, त्यावर कारवाई केली जावी अशी मागणी ही भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. प्रियांका गांधी यांच्या रोड शोसाठी नागपूरच्या बडकस लावण्यात आलेले अनधिकृत होर्डिंग आधी काही अज्ञातांनी काढल्याची माहिती आहे. त्यात या कारवाईमुळे मध्य नागपूर मतदासंघात काहीसा तनाव निर्माण झाल्याचे बघायला मिळाला आहे. नागपूरच्या संघ मुख्यालय परिसरातील बडकस चौक हा संघ मुख्यमालयचे दार समाजला जातो. आज या बडकस चौकात आज प्रियांका गांधी यांच्या रोड-शोची सांगता होणार आहे. त्यामुळे बडकस चौक भागात काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेले फुगे व पक्षाचे झेंडे अज्ञातांनी काढले
नागपूरमध्ये आज प्रियांका गांधी यांचे पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवार विकास ठाकरे व मध्य नागपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवार बंटी शेळके यांच्यासाठी दोन रोड शो होत आहे. या रोड शोचा समारोप संघ मुख्यमालयचे दार समाजल्या जाणाऱ्या बडकस चौकात होणार आहे. मात्र त्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. त्यामुळे बडकस चौक भागात काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी या परिसराची पाहणी केली आहे.
दरम्यान, प्रियंका गांधींच्या रोड शोच्या अनुषंगाने नागपुरातील बडकस चौक परिसरात स्वागतासाठी लावण्यात आलेले काही फुगे व पक्षाचे झेंडे काही अज्ञातानी काढून टाकले आहे. बच्छराज व्यास यांच्या चौकावरील पुतळ्याला चारही बाजूंनी घेरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी फुगे व झेंडे लावले होते. बच्छराज व्यास यांचा पुतळा उभ्या असलेल्या ठिकाण (तिथला गोल चौक) ला खेटून लावण्यात आलेले फुगे व झेंडे अज्ञात लोकांनी काढले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा रोष होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या