Sangli District Assembly Constituency : महिन्याभरापूर्वी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय, मात्र महिन्यानंतर भाजपकडून थेट उमेदवारीची घोषणा
सुरेश खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून चार वेळा बाजी मारली असून पाचव्यांदा आमदार होण्यासाठी त्यांच्यामसोर आव्हान असेल. दुसरीकडे, आमदार सुधीर गाडगीळ यांनाच सांगली विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली आहे.
Sangli District Assembly Constituency : महायुतीमधील (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला येणार याची चर्चा अजून सुरूच असताना सांगलीमध्ये पालकमंत्री सुरेश खाडे यांना पाचव्यांदा पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. भाजपच्या पहिल्या यादीत सुरेश खाडे यांना मिरजमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुरेश खाडे गेल्या काही वर्षांपासून मंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विविध खात्यांचा कारभार पाहिला आहे. सध्याच्या महायुती सरकारमध्ये ते कामगार मंत्री होते.
सुधीर गाडगीळ यांनाच सांगली विधानसभेसाठी उमेदवारी
सुरेश खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून चार वेळा बाजी मारली असून पाचव्यांदा आमदार होण्यासाठी त्यांच्यामसोर आव्हान असेल. दुसरीकडे, आमदार सुधीर गाडगीळ यांनाच सांगली विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली आहे. सांगली विधानसभेमध्ये सलग दोनवेळा सुधीर गाडगीळ यांनी विजय मिळवला आहे. मात्र, हॅट्ट्रिकची संधी असताना त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय जाहीर केला होता. गाडगीळ यांच्यासमोर सक्षम पर्यायाची चाचपणी भाजपकडून सुरु आहे. ते शक्य न झाल्यास भाजपकडून पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती.
सुधीर गाडगीळ निवडणुकीतून घेतली होती माघार
महिन्याभरापूर्वी भाजपाचे सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी एका पत्राद्वारे आगामी विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. तसेच यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी देखील मागणार नसल्याचे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात मध्ये म्हटले होते. सुधीर गाडगीळ यांनी 2014 आणि 2019 साली अशा दोन वेळा सांगलीतून विधानसभा निवडणूक लढली होती व त्यात ते विजयी देखील झाले होते. परंतु मध्यतरी 2024 ची विधानसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. निवडणुकीतून संन्यास घेतला असला, तरी भाजप पक्षाचाच काम करणार असून पक्ष जो उमेदवार येईल त्याचं प्रामाणिकपणे काम करेल असे देखील त्यांनी त्या लेटरमध्ये म्हटलेलं होत. दहा वर्षाच्या कार्यकाळात सांगलीमध्ये अनेक विकासकामे केल्याचे देखील त्यांनी संबंधित पत्रात म्हटले होते. सुधीर गाडगीळ यांनी अचानकपणे लेटर बॉम्ब टाकत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने सांगली भाजपमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर अनेक चेहरे आमदारकीसाठी पुढे येऊ लागले. शेवटी गाडगीळ यांचेच नाव पुढे आलं.
इतर महत्वाच्या बातम्या