एक्स्प्लोर
Kolhapur District Assembly Constituency : भाजपकडून कोल्हापूर दक्षिणमध्ये अमल महाडिक, इचलकरंजीमधून राहुल आवाडेंना उमेदवारी जाहीर, सांगलीत विद्यमान आमदारांना संधी
कोल्हापूर दक्षिणमधून माजी आमदार अमोल महाडिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इचलकरंजीमधून अपेक्षेप्रमाणे आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Kolhapur District Assembly Constituency : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशी महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश असून यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमधील उमेदवार सुद्धा घोषित करण्यात आले आहेत. कोल्हापूर दक्षिणमधून माजी आमदार अमोल महाडिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इचलकरंजीमधून अपेक्षेप्रमाणे आमदार प्रकाश आवाडे यांचे चिरंजीव राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांनी एक महिन्यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री आम्ही शाह यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा प्रवेश केला होता.
कोल्हापुरात भाजपच्या वाट्याला दोन जागा
दरम्यान, सांगलीमधून सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांना मिरजमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुधीर गाडगीळ यांना सुद्धा सांगलीमधील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यमान आमदार आहेत त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सुधीर गाडगीळ यांनी उमेदवारी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केलं होतं मात्र उमेदवार न मिळाल्याने पुन्हा एकदा सुधीर गाडगीळ यांच्या वरती भाजप नेतृत्वाकडून विश्वास दाखवण्यात आला आहे. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये कोल्हापूरमधील वाट्याला आलेल्या दोन मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आली आहेत.
सातारा जिल्ह्यात कोणाला संधी मिळाली?
दरम्यान, सातारा जिल्ह्यामधून मान विधानसभा मतदारसंघातून जयकुमार गोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कराड दक्षिणमधून डॉ. अतुल सुरेश भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सातारामधून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.. कणकवलीमधून नितेश नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीमध्ये विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. काही विद्यमान आमदारांना डावललं जाईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र पहिल्या यादीमधून तरी भाजपकडून विद्यमान आमदारांना डावण्यात आलेलं नाही
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
महाराष्ट्र
बीड
Advertisement