Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
कोल्हापूरला भाजपने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश कधी आलं नसल्याचे पाटील म्हणाले. उद्धव ठाकरे पाच नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Satej Patil on CM Eknath Shinde : कोल्हापूरची जनता पुन्हा एकदा मान गादीला देईल, छत्रपती घराण्याबद्दल कोल्हापूरकरांना प्रचंड आधार असल्याचा विश्वास काँग्रेस कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. सतेज पाटील म्हणाले की काँग्रेसचे उमेदवार म्हणून मधुरिमाराजे निवडणुकीमध्ये विजयी होतील. कोल्हापूरची जनता विश्वास आणि सत्याच्या बाजूने उभा राहील, असेही त्यांनी नमूद केले.
फोडाफोडी गुवाहाटी, सुरत लोक अजूनही विसरले नाहीत
आमदार सतेज पाटील यावेळी बोलताना भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की फोडाफोडी गुवाहाटी, सुरत ही लोक अजूनही विसरले नाहीत. कोल्हापूरला भाजपने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश कधी आलं नसल्याचे पाटील म्हणाले. उद्धव ठाकरे पाच नोव्हेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शाहू महाराज मधुरिमाराजेंच्या उमेदवारीर काय म्हणाले?
दुसरीकडे, खासदार शाहू महाराज यांनी सांगितले की, एका घराण्यातील व्यक्ती राजकारणात असेल तर पुष्कळ झालं, त्या दृष्टीने आमची हालचाली आणि वाटचाल सुरू होती. जनतेचं हित लक्षात घेऊनच आमची वाटचाल सुरू होती. पण जनतेचा रेटा होता. त्यामुळे आम्हाला मधुरीमाराजे छत्रपती यांना निवडणुकीला उतरावे लागले.
महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरात
दरम्यान, सत्ताधारी महायुतीचा महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून होणार आहे. पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता तपोवन मैदानावर महायुतीची पहिली जाहीर सभा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. 2014 मध्ये साली महायुतीच्या विधानसभेच्या प्रचाराचा प्रारंभ इचलकरंजीतून करण्यात आला होता.
उद्धव ठाकरे कोल्हापुरात प्रचाराचा नारळ फोडणार
उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर रोजी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच अॅजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मातोश्री आराम करतच तिकीट वाटपासह पक्षप्रवेश करून घेतले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे कोल्हापूरमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरेंच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्या असून दोन माजी आमदारांनी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला आहे. राधानगरीमधून केपी पाटील यांनी मशाल हाती घेतली आहे. शाहुवाडीतून सत्यजित पाटील रिंगणात आहेत. माजी आमदार उल्हास पाटील, सुजित मिणचेकर यांनी स्वाभिमानीत प्रवेश केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या