एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, आता पाडण्याचं काम करणार; नव्या भूमिकेतील 5 मोठे मुद्दे!

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत काय सांगितलं, हे पाच मुद्द्यांत समजून घ्या.

मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, आता पाडण्याचं काम करणार; नव्या भूमिकेतील 5 मोठे मुद्दे!
जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. ते यावेळी एकाही जागेवर उमेदवार उभा करणार नाहीत. सोबत घेतलेल्या पक्ष, घटकांनी आतापर्यंतही आपल्या उमेदवारांची यादी न दिल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं जरांगे यांनी सांगितलंय. दरम्यान, आता निडणुकीत भाग घेतला नसला तरी मराठा समाजाने ज्याला पाडायचं आहे, त्याला पाडावं, असं जाहीर केलं आहे. जरांगे यांनी आपल्या नव्या भूमिकेत नेमकं काय म्हटलंय, ते पाच मुद्द्यांत जाणून घ्या..

मनोज जरांगे यांनी आज (4 नोव्हेंबर) सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांची नवी भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनुसार निवडून न येण्याचं गणित जुळून येत नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

1) रात्री दहा-एक हजार मराठा बांधव होते. रात्री आमची चर्चा झाली. एका जातीवर निवडणूक लढवायची का? असं मी विचारलं. त्यानंतर ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असं ठरवण्यात आलं. त्यामुळे मी सगळ्या बांधवांना सांगतो की त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. कारण हा आपला खानदानी धंदा नाही. आपली फसगत होईल. लोक आपल्यावर हसतील. सगळे अर्ज काढून घ्या, असं जरांगे म्हणाले. 

एका जातीवर जिंकणं शक्य नाही

2) आपलं आंदोलन चालूच राहील. ही निवडणूक संपली की पुन्हा एकदा आपलं आंदोलन चालूच राहील. आपण पुन्हा आपल्या जातीसाठी लढू आणि मिळवू. पण एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. एका जातीवर पुढं जायचं की नाही, यावर चर्चा झाली. एका जातीवर जिंकणं शक्य नाही. तरीदेखील उमेदवार उभं करण्याचा निर्णय घेतल्यास समाजाचं वाटोळं केल्याचा आरोप माझ्यावर येईल. त्यामुळेच ही निवडणूक न लढता सगळी पाडापाडी करायची ठरवलं आहे, असं जरांगेंनी सांगितलं.

ज्याला पाडायचे आहे, त्याला पाडावे

3) काही अडचणीमुळे मित्रपक्षांची यादी आली नाही. तेही आमचे बंधूच आहेत. आम्ही भविष्यातही एकच असणार आहोत. राजकारण आहे, असं होत असतं. याला-पाड आणि त्याला पाड म्हणण्याची माझी इच्छा नाही. कारण कोणही आपल्या कामाचं नाही. पण मराठा समाजाने मला भूमिका घेण्यास सांगितलं. लोकांनी ज्याला पाडायचे आहे, त्याला पाडावे. ज्याला निवडून आणायचे आहे, त्याला निवडून आणावे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

पहाटे पाच वाजेपर्यंत बसलोच नसतो

4) राज्यातील कोट्यवधी मराठा एक आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेत राहिलो तरी आमचा प्रभाव कायम राहणार आहे. दलित, मुस्लीम, मराठा समीकरण जुळून आले असते तर राज्यात आमचे पाच-दहा, मुस्लिमांचे चार-पाच, दलितांचे चार-पाच आमदार झाले असते. पण ते शक्य झालं नाही. आम्ही माघार घेणारे असतो तर पहाटे पाच वाजेपर्यंत बसलोच नसतो. याला माघार म्हणत नाहीत. आम्ही मतदारसंघही ठरवले होते. याला तुम्ही काहीही म्हणा. याला थोडक्यात गनिमी कावा म्हणा, असंही जरांगे म्हणाले.

उमेदवाराकडून मराठा आरक्षणासंदर्भात लिहून घ्या

5) मी कालपासून सांगत होतो. एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. आम्ही आमच्या मित्रपक्षांना आणखी एक-दोन दिवस दिले असते. पण आता वेळ शिल्लक राहिलेला नाही. मला समाजाला हेच सांगणं आहे की, तुम्हाला ज्याला मतदान करायचं आहे त्या उमेदवाराकडून मराठा आरक्षणासंदर्भात लिहून घ्या, त्याच्याकडून व्हिडीओ करून घ्या. मी माझं आंदोलन चालवणार आहे. मला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर मग मी त्याचा निवडणुकीत कार्यक्रम करणारच, असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले.

हेही वाचा :

Lakshamn Hake on Manoj Jarange: 'जरांगे नावाचं वटवाघुळ औकातीवर आलं', मनोज जरांगेंच्या 'माघार'च्या निर्णयावर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीतून माघार, एकही उमेदवार उभा करणार नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget