विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये कोणाचं वर्चस्व? कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार? सध्याची राजकीय परिस्थिती काय?
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकांचे (Vidhan Sabha Election) बिगुल वाजणार आहे. अशातच लातूर जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना वेग आलाय. जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत, याबाबतची सविस्तर माहिती
Vidhasabha Election Latur District MLa List : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी संपली आहे. आता राज्यात पुढच्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) बिगुल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीची अद्याप घोषणा झालेली नसली तरी, सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली असून राजकीयदृष्ट्या जुळवाजुळव गाठी भेटी बैठका सुरु झाल्या आहेत. अशातच लातूर (Latur) जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र, सध्या लातूर जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व आहे? कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लातूर जिल्हा हा दिग्गज नेतेमंडळींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कारण, या जिल्ह्याने आत्तापर्यंत राज्याला दोन मुख्यमंत्री दिले आहेत. यामध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, अलिकडच्या काळातील लातूर जिल्ह्यातील राजकार खूप बदललं आहे. राजकीय समीकरण बदलली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्याचे वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सातत्यानं राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान, आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या अनुषंगाने सध्या लातूर जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत? राजकीय समीकरणं काय आहेत? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
लातूर जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार (Latur MLA List)
234 ) लातूर ग्रामीण विधानसभा - धीरज देशमुख (काँग्रेस)
235) लातूर शहर विधानसभा - अमित देशमुख (काँग्रेस)
236) अहमदपूर विधानसभा - बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार)
237) उदगीर विधानसभा - संजय बनसोडे (राष्ट्रवादी - अजित पवार)
238) निलंगा विधानसभा - संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
239) औसा विधानसभा - अभिमन्यू पवार (भाजप)
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ :
2019 च्या विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख याचे चिरंजीव धीरज देशमुख विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांचा मोठ्या मतांनी पराभव केला होता. धीरज देशमुख हे 1 लाख 31 हजार 321 मतांना विजयी झाले होते. धीरज देशमुख यांच्यानंतर नोटाला मतदारांनी सर्वाधिक मतदान केलं होतं. मतदारांनी तब्बत 26,899 मतं याठिकाणी नोटाला दिली आहेत.
लातूर शहर विधानसभा
2019 मध्ये हा मतदारसंघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जिंकला होता. लातूर शहर हा महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या शैलेश गोविंदकुमार लाहोटी यांचा 40415 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली होती.
अहमदपूर विधानसभा
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बाबासाहेब मोहनराव पाटील हे विजय झीले होते. त्यांनी 84,636 मते मिळवून विजय मिळवला होता. भाजपाचे विनायकराव किशनराव जाधव पाटील यांचा बाबासाहेब यांनी पराभव केला होता. सध्या बाबासाहेब पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.
उदगीर विधानसभा
2019 मध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय बाबूराव बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदारसंघातून विजय झाले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे अनिल सदाशिव कांबळे यांचा 20579 मतांनी पराभव केला होता. सध्या संजय बनसोडे हे मंत्री असबन, ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.
निलंगा विधानसभा
2019 मध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. या मतदारसंघातून 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर हे विजयी झाले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा 32131 मतांनी पराभव केला होता.
औसा विधानसभा
औसा विधानसभा मतदारसंघ 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने जिंकला होता.
या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अभिमन्यू दत्तात्रय पवार यांनी विजय मिळवला होता. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बसवराज महाद्वाराव पाटील यांचा 26714 मतांच्या फरकाने पराभव केला होता.
सध्या महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती आमदार? (Maharashtra Vidhansabha MLA List 2019)
महायुती : 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)
महाआघाडी : 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)
महत्वाच्या बातम्या: