रविकांत तुपकरांचा मोठा निर्णय, विधानसभा निवडणुकीत 'या' उमेदवारांना देणार पाठिंबा, मविआला देणार धक्का
विधानसभा निवडणुकीत रविकांत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना (krantikari shetkari sanghatana) महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याचा निर्णय तुपकरांनी जाहीर केलाय.
Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी विधानसभा निवडणूकीची (Vidhansabha Election) भूमिका ठरवली आहे. या विधानसभा निवडणुकीत तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना (krantikari shetkari sanghatana) महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याचा निर्णय तुपकरांनी जाहीर केलाय. बुलढाण्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला.
दरम्यान, काही मतदारसंघात कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्याच्या सुचना तुपकरांनी दिल्या आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात स्वच्छ चारित्र्याच्या, शेतकऱ्यांशी नाळ असलेल्या, चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या चांगल्या विचारांच्या अपक्ष उमेदवारांना पाठींबा देणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.
25 जागांवर उमेदवार देण्याची तयारी
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात रविकांत तुपकर यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. आगामी काळात रविकांत तुपकर हे महाराष्ट्र दौरा करणार असून जवळपास 25 जागांवर उमेदवार देण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. लोकसभेला बुलढाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते. यावेळी त्यांचा निवडणुकीत पराभव जरी झाला असला तरी त्यांनी जवळपास अडीच लाख मत घेतली होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मत विभाजन आणि नुकसान टाळण्यासाठी रविकांत तुपकर यांना सोबत घेण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीत सकारात्मक चर्चा होती. मात्र, आता त्यांना महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला आहे.