एक्स्प्लोर

Amit Ghoda: हितेंद्र ठाकूरांना भेटले, नॉट रिचेबल झाले; उमेदवार अमित घोडा 24 तासांपासून गायब, पालघरमध्ये नेमकं काय घडतंय?

Amit Ghoda Palghar Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महायुतीकडून राजेंद्र गावित यांना महायुतीकडून उमेदवारी दिल्याने अमित घोडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

Amit Ghoda Palghar: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दिवाळी संपल्यानंतर म्हणजेच 4 नोव्हेंबरपासून प्रचाराला जोर आणखी वाढताना दिसेल. मात्र पालघर जिल्ह्यात एका वेगळ्याच पातळीवर राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. पालघर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अमित घोडा (Palghar Amit Ghoda) गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. 

भाजप नेते माजी आमदार अमित घोडा (Amit Ghoda) यांनी पालघर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमित घोडा गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल झाले आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच अमित घोडा यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीत ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. त्यांनी भाजपाकडून आयात करण्यात आलेल्या माजी खासदार शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

भाजपला बंडखोरी रोखण्यात यश मिळणार?

अमित घोडा हे मागील शिवसेनेचे आमदार असून 2019 मध्ये उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना डहाणू किंवा पालघरची उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र ऐनवेळी राजेंद्र गावित यांना महायुतीकडून उमेदवारी दिल्याने अमित घोडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या म्हणजे 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यामुळे अमित घोडा आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का?, भाजपला बंडखोरी रोखण्यात यश मिळणार का?, हे उद्यापर्यंत स्पष्ट होणार आहे.  

पालघरमधील विद्यामान आमदार श्रीनिवास वनगाही होते नॉट रिचेबल-

पालघरचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यामान आमदार यांना शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट न दिल्याने ते देखील नाराज होते. श्रीनिवास वनगा यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तब्बल 4 दिवस श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल होते. जवळपास 100 तासांनंतर श्रीनिवास वनगा घरी परतले होते. घरी पुन्हा आल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या चेहऱ्यावर नाराजी, राग, दुःख दिसून येत आहे. चार दिवसांनंतर घरी परतल्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी पुन्हा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. षडयंत्र करून माझं तिकीट कापलं गेलं. पद असलं नसलं तरी, मी काम करत राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला विश्वासू वाटतात, पण त्यांच्या जवळची लोकं त्यांना मिस गाईड करतात, अशी नाराजी श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केली. 

अपक्ष उमेदवार अमित घोडा 24 तासांपासून गायब, Video:

संबंधित बातमी:

Shrinivas Vanaga: श्रीनिवास वनगा तब्बल 4 दिवसानंतर घरी परतले; म्हणाले, एकनाथ शिंदे विश्वासू, पण त्या लोकांना सोडणार नाही!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget