एक्स्प्लोर

विजयाची खात्री आहे का? मंत्री तानाजी सावंत म्हणाले 1 लाख टक्का, 23 तारखेला महायुतीच गुलाल उधळणार

सरकारनं सर्व घटकासाठी योजना राबवल्या आहेत. त्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या असून, महायुती एकसंघ असल्याचे मत मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक्त केले.

Tanaji Sawant : सरकारनं सर्व घटकासाठी योजना राबवल्या आहेत. त्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या असून, महायुती एकसंघ आहे. त्यामुळे येत्या 23 नोव्हेंबरला राज्यात महायुतीच विजयाचा गुलाल उधळेल असा विश्वास आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी व्यक्त केला आहे.  भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातून 1 लाख टक्क विजयाची खात्री मला असल्याचे सावंत म्हणाले.  आजचा मुहूर्त साधत डॉक्टर तानाजी सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी ते बोलत होते. 

धाराशिव कळंब विधानसभेच्या जागेचा तिढा आज सुटेल 

आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज तुळजाभवानीचे दर्शन घेऊन मुहूर्त साधत भूम परंडा वाशी विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते. 28  नोव्हेंबरला डॉ. सावंत यांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज पुन्हा दाखल करणार आहेत. सरकारने सर्व घटकासाठी योजना राबवल्या व त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. महायुती एकसंघ आहे. त्यामुळे येत्या 23 नोव्हेंबरला महायुती राज्यात विजयाचा गुलाल उधळेल असा विश्वास आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच धाराशिव कळंब विधानसभेच्या जागेचा तिढा आज सुटेल अशी माहिती सावंत यांनी दिली. सावंत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तानाजी सावंतांच्या विरोधात ठाकरे गटाकडून रणजित पाटील मैदानात 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून (Shiv Sena Uddhav Thackeray Group) काल 65 नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये काही ठिकाणी  नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. परांडा विधानसभा मतदारसंघातून (Paranda Assembly Election) ठाकरे गटानं निष्ठावंत शिवसैनिकाच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलगा रणजित पाटील (Ranjit Patil) यांना उमेदवारी दिली आहे. पण उमेदवारी यादी प्रसिद्ध करताना चुकून राहुल पाटील असे नाव देण्यात आले आहे. मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याविरोधात ते मैदानात उतरवले आहेत. परांडा विधानसभा मतदारसंघातील आमदार तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. गेल्या वेळेस त्यांच्या विरोधात राहुल मोटे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राहुल मोटे हे इच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटला आहे.  तीन टर्म आमदार राहिलेल्या राहुल मोटेंचा पत्ता यावेळेस कट झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

उद्धव ठाकरेंना जाण, मृत ज्ञानेश्वर पाटलांच्या लेकाला उमेदवारीचा सन्मान; तानाजी सावंतांविरुद्ध निष्ठेचं कार्ड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : अर्ज नेत्यांचा, त्रास जनतेला; शक्तिप्रदर्शनामुळे वाहतूक कोंडीDevendra Fadnavis Nagpur : उद्यापर्यंत भाजपची दुसरी यादी जाहीर करणार : देवेंद्र फडणवीसRajkiya Sholay : दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीची खलबतं, बैठकीची इनसाईड स्टोरीZero Hour : लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार मुख्यमंत्र्यांची शाहांसमोर अधिक जागांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
Raju Shetti : सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
Embed widget