एक्स्प्लोर

Eknath Khadse : पुढील निवडणूक मी पाहणार की नाही हे ईश्वरच ठरवेल, पण..; भावनिक साद घालत एकनाथ खडसेंची मोठी घोषणा 

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या राजकीय संन्यासाची मोठी घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी मुक्ताईनगर मतदासंघांतील जनतेला भावनिक साद घालत रोहिणी खडसे यांना निवडून द्यावे, असे आवाहन केलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान नेतेमंडळी एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करताना दिसतायत. दरम्यान, आज (सोमवार) संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार असताना राज्यातील दिग्गज नेत्यांच्या सांगता सभा पार पडणार आहे. या सांगता सभांकडे साऱ्यांचे लक्ष लागले असताना राज्याच्या राजकीय वर्तुळाळतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या चार दशकांपासून कार्यरत असलेले पूर्वीश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपल्या राजकीय संन्यासाची (Political Retirement) घोषणा केली आहे.

यावेळी त्यांनी मुक्ताईनगर मतदासंघांतील जनतेला भावनिक साद घालत रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन केलं आहे. राज्यात एकीकडे सर्वत्र  प्रचाराच्या शेवटच्या दिवशी धावपळ सुरू असताना एकनाथ खडसे यांनी केलेल्या या घोषणेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

नेमकं काय म्हणाले एकनाथराव खडसे?     

मुक्ताईनगर मतदासंघांतील मायबाप जनतेला माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे साहेब यांचे विनम्र आवाहन. यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिले आहेत. मी ही तुमच्या सुख दुःखात सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आता पर्यंत पार पाडली आहे. तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल.

पुढील निवडणुकीत कदाचित मी असेल किंवा नसेल. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे की, आपण सर्वांनी रोहिणीताईंना निवडून द्यावे. आपण जसं मला सहकार्य केलं तसं रोहिणीताईंना (Rohini Khadse) करावं आणि रोहिणी ताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे ही विनंती. असे म्हणत एकनाथराव खडसे यांनी मतदारांना भावनिक साद घातली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget