Palus-Kadegaon Vidhan Sabaha : कडेगाव पलूस विधानसभेला महायुतीकडून संग्रामसिंह देशमुखांचा अर्ज दाखल, जयंत पाटील आज दाखल करणार
Palus-Kadegaon Vidhan Sabaha : संग्रामसिंह देशमुख यांनी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता निवडक नेत्यांसोबत निवडणूक निर्णय अधिकारी रणजीत भोसले यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Palus-Kadegaon Vidhan Sabaha : कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून (Palus-Kadegaon Vidhan Sabaha) माजी जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी आज (24 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, सतीश देशमुख,चंद्रसेन देशमुख, जयदीप देशमुख,दत्तात्रय सुर्यवंशी, नगराध्यक्ष धनंजय देशमुख, शिवाजीराव मगर पाटील,उपनगराध्यक्ष अमोल डांगे ,पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद भैय्या पाटील पलूस तालुका संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष मा. सर्जेराव अण्णा नलवडे, संजय भाऊ येसुगडे, दीपक मोहिते आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बांधावर योजनांचे पाणी दिल्याशिवाय गप्प बसणार नाही
संग्रामसिंह देशमुख यांनी आज कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता निवडक नेत्यांसोबत निवडणूक निर्णय अधिकारी रणजीत भोसले यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. संग्रामसिंह देशमुख म्हणाले की, स्व.संपतराव देशमुख यांच्या विचारांचा वसा व वारसा घेऊन प्रथमच निवडणुक लढवत आहे. या मतदारसंघात शेकडो कोटींची विकासकामे जिल्हा परिषद माध्यमातून मार्गे लावली आहेत. याच बरोबर टेंभू, ताकारी योजनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून विस्तारीत कामांना गती दिली आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर या योजनांचे पाणी दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. निवडणूक विकास कामावर लढवत असून माझा विजय नक्की आहे.
जयंत पाटील आज अर्ज दाखल करणार
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज उरण-इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासाठी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. पंचायत समिती इस्लामपूर येथून अर्ज भरण्याच्या रॅलीची सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी जयंत पाटील, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना येथील राम मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसिंह नाना पाटील आणि हुतात्मा स्मारकास अभिवादन करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यंदा आठव्यांदा अर्ज दाखल करणार आहेत. जयंत पाटील यांनी 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढली असून इस्लामपूरच्या जनतेने आजतागायत त्यांच्यावर मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. यंदा आठव्यांदाही जयंत पाटीलच विजयी होतील याचा विश्वास जनतेच्या मनात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या