Vishal Patil on Sanjay Patil : जो स्वार्थासाठी स्वतःच्या पोराला बाजूला करतो, तो जनतेसाठी काय लढणार? खासदार विशाल पाटलांचा संजय पाटलांवर हल्लाबोल
सोळा वर्षे आमदार, दोन वेळा खासदार, पण सत्तेत राहून सुद्धा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेल्या नाहीत. दुसऱ्याने केलेल्या कामावर स्वतःला नाव जोडायची वेळ येते, अशी टीका विशाल पाटील यांनी केली.
सांगली : सत्तेचा माज आलेला नेता आता विधानसभेनंतर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) तासगावची (Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha) नगरपरिषद लढेल, जो स्वार्थासाठी स्वतःच्या पोराला बाजूला करतो तो जनतेसाठी काय लढणार? असा थेट हल्लाबोल खासदार विशाल पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर केला. भुताला काढण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत, त्याला पुन्हा डोके वर काढू देणार नाही, असा इशाराही खासदार विशाल पाटील यांनी दिला.
कदाचित तासगावची नगरपरिषद देखील लढतील
विशाल पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्यात सत्तेचा माजलेला एक नेता निर्माण झाला होता. जनतेने सत्ता काढून घेतल्यानंतर ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. काहीतरी करून पुन्हा सत्ता काबीज करायची या भावनेने ते आता आमदारकी लढत आहेत. येथील पराभवानंतर कदाचित तासगावची नगरपरिषद देखील लढतील. सोळा वर्षे आमदार, दोन वेळा खासदार, पण सत्तेत राहून सुद्धा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेल्या नाहीत. दुसऱ्याने केलेल्या कामावर स्वतःला नाव जोडायची वेळ येते. त्यामुळे संजय काका पाटील सत्तेसाठी विधानसभा लढत आहेत.
तो जनतेसाठी काय करणार?
त्यांनी सांगितले की, संजय काका पाटील यांचा रोहित पाटील यांच्या विरोधात खूप मोठ्या फरकाने पराभव होणार आहे. सत्तेच्या लालसेपोटी जनतेने उतरले आहे तरीदेखील त्यांना अजून हवा आहे. इतके दिवस सांगत होते की प्रभाकर पाटील आमदार होणार. जो सत्तेसाठी पोराला बाजूला करून स्वतः लढतो तो जनतेसाठी काय करणार? स्वतःच्या पोरासाठी जो थांबू शकत नाही. हे जनता आता जाणून आहे. रोहित पाटील हे आमच्यासाठी राबले आहेत. आता आमच्यावर पैरा फेडण्याची वेळ आली आहे.
त्या भुताला पुन्हा वर डोकं वर आणू देऊ नका
कोणत्या अडचणीमुळे अजितराव घोरपडे यांनी संजय काका पाटील यांना पाठिंबा दिला हे माहीत नाही. पण मी अजितराव घोरपडे यांना विनंती करणार आहे की ज्या भुताला काढण्यासाठी आपण एकत्र आलो. त्या भुताला पुन्हा वर डोकं वर आणू देऊ नका असं मी त्यांना सांगितलं आहे. पण अजितराव घोरपडे यांनी कोणत्या दबावामुळे त्यांनी हा निर्णय घेतला हे माहीत नाही. पण अजितराव घोरपडे यांचे कार्यकर्ते तरुण उमेदवाराच्या पाठीशी आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या