एक्स्प्लोर

Amol Kolhe : गद्दारीचा काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ; डॉ.अमोल कोल्हेंची अजित पवारांवर टीका

Yavatmal District Vidhan Sabha Election 2024 : गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने कधीच झाकला जाऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याची जोरदार टीका डॉ.अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर केलीय.

Yavatmal District Vidhan Sabha Election 2024 यवतमाळ : यवतमाळच्या पुसद येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शरद मैंद यांच्या प्रचारार्थ सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा चांगलाच समाचार घेतला. गद्दारीचा काळा डाग हा गुलाबी रंगाने कधीच झाकला जाऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ असल्याची जोरदार टीका केलीय. पंतप्रधान मोदी यांनी सभेत 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारवर बोलले आणि गुलाबी जॅकेटवाले पवार साहेबांचे बोट सोडून भाजपच्या मांडीवर जाऊन बसल्याची टीका ही त्यांनी यावेळी केली. तसचे तुमच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या असे दाखविले जात आहे. या योजनांच्या जाहिरातीवर 15 दिवसात 700 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता कळू न देता दहा हाताने सामान्य नागरिकांच्या खिशातून हे पैसे काढण्याचे काम सुरू असल्याचेही खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले.

चाय वर सुरू झालेलं सरकार गाय वर अटकले 

2019 ला युवकाला संधी दिली, मात्र 2 जुलै 2023ला पक्षात  फूट पडली. गुलाबी रंग नेमका सांगतो काय? तर 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आणि भाजपच्या मांडीवर जाऊन ते बसले. विचारले तर विकासासाठी गेला असे सांगतात, तर नेमका एक तरी प्रकल्प पुसदमध्ये आणला का? कुणाला रोजगार इथल्या युवकाला मिळाला का? निव्वळ चाय पर सुरू झालेलं  सरकार गाय पर अटक गयी, बात हुई 15 लाख की 1500 पे अटक गुई, असा मिश्किल टोलाही अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यासह सरकारला लगावला आहे.

महाराष्ट्रात भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणारे सरकार

सत्ताधाऱ्यांनी तुमच्यासाठी जी योजना आणली त्याच्या जाहिरातीवर 15 दिवसात 700 कोटी खर्च केलाय. योजना दाखवून दहा हाताने खिशातून पैसे काढत आहे, असे हे सरकार आहे. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावत आहे. महायुती फक्त विकासाच्या गप्पा मारणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या पाहून 71 हजार कोटींची कर्ज माफी पवार साहेब यांनी केली. ज्या विकासासाठी गुलाबी गॅंग सत्तेत सामील झाली तेव्हा विकास कुठे गेला होता. शेतीला भाव नाही. 9 महिन्यात  आकडेवारी पहिली तर 1900 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. हा विकास नाही भकास आहे. दिल्लीतुन वाजले की माना हलविणारे सरकार आहे. प्रत्येक उद्योग धंदा गुजरातला जात आहे. महाराष्ट्रात भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करनारे सरकार आहे, अशी टीकाही  अमोल कोल्हे यांनी सरकारवर केली आहे.  

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Chhagan Bhujbal on Rajya Sabha Election 2026: 'इतरांना जो न्याय मिळाला तो मलाही मिळायला पाहिजे होता'; नाराजीबाबत विचारताच छगन भुजबळांचं सूचक उत्तर, म्हणाले...
'इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय मिळाला तो मलाही मिळायला पाहिजे होता'; नाराजीबाबत विचारताच छगन भुजबळांचं सूचक उत्तर, म्हणाले...
Nashik Vidhan Parishad Election 2026: नाशिकच्या माघारीवर जळगावचा तिढा अडकला, गिते-हिरेंचं बंड शमवण्यासाठी महायुतीची धावपळ; भाजपच्या संकटमोचकांना यश मिळणार?
नाशिकच्या माघारीवर जळगावचा तिढा अडकला, गिते-हिरेंचं बंड शमवण्यासाठी महायुतीची धावपळ; भाजपच्या संकटमोचकांना यश मिळणार?
Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम
राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम; आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार
Mumbai Best Bus Accident: बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; टॅक्सी आडव्या पडल्या, दुचाकी चक्काचूर, दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
बेस्ट बसची 4 वाहनांना धडक, एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी; दादरमध्ये हादरवणारी दृश्य, PHOTO
Bacchu Kadu On Eknath Shinde: देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
देवाभाऊंचं प्रमोशन आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री..., जितके डावलतील, तितके मनात शिरतील, बच्चू कडूंचं स्फोटक भाष्य
Gold Rate : गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले, नवे दर एका क्लिकवर
गुड न्यूज सोने चांदीचे दर गडगडले, सोने 2000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 6000 रुपयांनी घसरले 
Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम
राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम; आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी
Iran Israel War : एअरस्पेस बंद, सर्वत्र सायरनचे आवाज, इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, जागतिक मार्केट क्रॅश
इराण आणि इस्त्रायलकडून रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा,क्रूड ऑईलचे दर भडकले, आशियातील बाजार गडगडले
Chhagan Bhujbal on Rajya Sabha Election 2026: 'इतरांना जो न्याय मिळाला तो मलाही मिळायला पाहिजे होता'; नाराजीबाबत विचारताच छगन भुजबळांचं सूचक उत्तर, म्हणाले...
'इतरांच्या मुलाबाळांना जो न्याय मिळाला तो मलाही मिळायला पाहिजे होता'; नाराजीबाबत विचारताच छगन भुजबळांचं सूचक उत्तर, म्हणाले...
Embed widget