Vidhan Parishad Election 2024: शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणुकीत कोणाची माघार? अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
Vidhan Parishad Election 2024: मनसेकडून (MNS) कोकण पदवीधर निवडणुकीसाठी (Konkan Graduate Election) अभिजीत पानसेंना उमेदवारी घोषित केली होती. पण, भाजपच्या मनधरणीनंतर मनसेकडून उमेदवारी मागे घेण्यात आली आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: मुंबई : लोकसभा निवडणुकांनंतर (Lok Sabha Election 2024) राज्यात आता विधानपरिषद निवडणुकांचे (Vidhan Parishad Election) वारे वाहू लागले आहेत. महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) आणि महायुतीमध्ये (Mahayuti) युती आणि आघाडी धर्म न पाहता उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मुंबई शिक्षक (Mumbai News), मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार विधान परिषद मतदारसंघांमध्ये येत्या 26 जूनला निवडणुका होणार आहेत. दरम्यान, मनसेकडून (MNS) कोकण पदवीधर निवडणुकीसाठी (Konkan Graduate Election) अभिजीत पानसेंना उमेदवारी घोषित केली होती. पण, भाजपच्या मनधरणीनंतर मनसेकडून उमेदवारी मागे घेण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर चार विधान परिषदेच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील जवळपास प्रत्येक पक्षानं आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये युती आणि आघाडी धर्म पाळला गेलेला नाही. त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कोणत्या उमेदवारांनी कोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरला आहे?
कोकण पदवीधर
निरंजन डावखरे (भाजप) विरुद्ध किशोर जैन (शिवसेना ठाकरे गट ) विरुद्ध रमेश कीर (काँग्रेस) विरुद्ध संजय मोरे (शिवसेना) विरुद्ध अमित सरैय्या (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
मुंबई पदवीधर
किरण शेलार (भाजप) विरुद्ध अनिल परब (शिवसेना ठाकरे गट ) विरुद्ध दिपक सावंत (शिवसेना)
मुंबई शिक्षक
शिवनाथ दराडे (भाजप) विरुद्ध ज. मो. अभ्यंकर(शिवसेना ठाकरे गट ) विरुद्ध शिवाजीराव नलावडे (राष्ट्रवादी), सुभाष मोरे (शिक्षक भारती )
नाशिक शिक्षक
- किशोर दराडे (शिवसेना)
- महेंद्र भावसार (राष्ट्रवादी काँग्रेस)
- संदीप गुळवे (शिवसेना ठाकरे गट)
- दिलीप पाटील (काँग्रेस)
26 जूनला विधानपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया
केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांकरिता निवडणूक होत आहे. 26 जून 2024 रोजी मतदान होणार आहे, तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे. मंत्रालयात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीत चोक्कलिंगम यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती संबंधितांना दिली.
भाजपच्या मनधरणीनंतर मनसेची विधान परिषदेतून माघार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधरसाठी अभिजीत पानसेंच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासूनच भाजपकडून विधान परिषदेवर असलेले निरंजन डावखरेंचं काय होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसेनं जाहीर केलेला उमेदवार महायुतीचा की, मनसे स्वबळावर लढणार अशा चर्चा सुरू होत्या. त्यामुळे भाजपकडून राज ठाकरेंची मनधरणी केली जाणार का? अशाही चर्चा सुरू होत्या. अशातच आता भाजपनं विधान परिषदेसाठी यादी जाहीर केली. कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर निरंजन डावखरेंनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. भाजप पक्षश्रेष्ठींकडूनही राज ठाकरेंना विधान परिषदेची उमेदवारी मागे घेण्यासाठी गळ घालण्यात आली. त्यानंतर मनसेकडून अभिजीत पानसे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.