एक्स्प्लोर

Pune Bypoll Election : कसबा, चिंचवडमध्ये भाजपकडून प्रचाराचा धुमधडाका; अमित शहांनंतर राज्य मंत्रिमंडळातील 'हे' नेते मैदानात

पुण्यातील (Pune Bypoll) कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीकडून भाजपच्या (BJP) विरोधात तगडं आव्हान उभं करण्यात आल्यानं भाजपनं आपली सगळी ताकद पणाला लावायचं ठरवलं आहे.

Pune Bypoll election : पुण्यातील कसबा विधानसभा  (Pune Bypoll Election) पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीकडून भाजपच्या विरोधात तगडं आव्हान उभं करण्यात आल्यानं भाजपनं आपली सगळी ताकद पणाला लावायचं ठरवलं आहे. त्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavhan) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) हे 26 तारखेपर्यंत म्हणजे निवडणूक होईपर्यंत पुण्यात तळ ठोकून असणार आहेत. आज बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिवसभर कसबा मतदारसंघात (Kasba Peth Assembly Constituency) प्रचार करणार आहेत. तर 18 आणि 19 तारखेला स्वतः अमित शाह पुण्यात असणार आहेत.  शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या प्रचाराच्या सभाही पुण्यात होणार आहेत. 

कसब्यात मागील चाळीस वर्ष भाजपची सत्ता होती. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जात आहे. महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाय कसब्यात आतापर्यंत ब्राह्मण समाजाचा उमेदवार उभा राहायचा, त्यामुळे कसब्यात भाजपची सत्ता असायची. यावेळी उमेदवार ब्राह्मण समाजाचा नाही. त्यामुळे भाजपला पारडं जड करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी त्यांनी प्राचाराचं योग्य नियोजन केलं आहे. त्यात भाजपचे अनेक दिग्गज नेते नागरिकांना साद घालण्यासाठी पुण्यात येणार आहे. 

मनसे देणार भाजपला पाठिंबा

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भाजपला पाठींबा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबतची भूमीका जाहीर केल्याची माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे. हिंदुत्व आणि विकास हे दोन्ही मुद्दे प्रभावशाली पद्धतीने पुढे नेणारा एकच घटक सध्या आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. त्यामुळेच पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला पूर्ण सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय मी घेत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटलं असल्याचं वागस्कर यांनी सांगितलं आहे. 

महाविकास आघाडीची पहिली सभा जोरात...

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचार सभादेखील दणक्यात पार पडत आहेत. दोन दिवसांपूर्वी कसब्यात विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले यांच्या उपस्थितीत पहिली प्रचार सभा झाली त्यावेळी बऱ्याच कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. बेरोजगारी आणि तरुणाच्या प्रश्नांना समोर ठेवून यंदा महाविकास आघाडी निवडणुकीत उतरली आहे. प्रचाराला काहीच दिवस उरले आहेत. त्यात आता  कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अजित पवार आणि अशोक चव्हाण कसब्यात प्रचार करत आहे. मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभांचे आयोजन करण्याचाही प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :  

Nashik Sanjay Raut: कसबा-चिंचवड परीक्षेत महाविकास आघाडी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होईल, संजय राऊतांचा विश्वास

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SA 2nd T20 : टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
टीम इंडियाचा फ्लॉप शो, तिलक वर्माचं अर्धशतक पाण्यात, दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या टी 20 मध्ये अस्मान दाखवलं, मालिकेत 1-1 बरोबरी
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
Embed widget