Maharashtra Loksabha Election Result Live Update : कोल्हापूर, हातकणंगले, साताऱ्यात महाविकास आघाडी जोरात; पुण्यात महायुतीचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर
महाविकास आघाडीकडून ठाकरे गट 10 जागांवरती आघाडीवर आहे. शरद पवार गट सहा जागांवर आघाडीवर असून काँग्रेस आठ जागांवर आघाडीवर आहे, तर इतर दोन उमेदवार आघाडीवर आहेत.
Maharashtra Loksabha Election Result Live Update : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने जोरदार आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि पहिल्या सुरुवातीच्या कलांमध्ये जवळपास 24 मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. महायुतीकडून भाजप 15 जागांवर आघाडी आहेत. शिंदे गट सहा जागांवर आघाडीवर आहे, तर अजित पवार गट एक जागांवरती आघाडीवर आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गट 10 जागांवरती आघाडीवर आहे. शरद पवार गट सहा जागांवर आघाडीवर असून काँग्रेस आठ जागांवर आघाडीवर आहे, तर इतर दोन उमेदवार आघाडीवर आहेत.
- बारामतीतून चौथ्या फेरी अखेर सुप्रिया सुळे 19 हजार मतांनी आघाडीवर
- पाचव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 23 हजार 250 मतानी आघाडीवर
- महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील हे 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत
- साताऱ्यातून 27 हजारांनी शशिकांत शिंदे पुढे आहेत.
मोठी बातमी : माढा लोकसभा मतदारसंघात विजयसिंह मोहित पाटील यांना पहिला गुलालhttps://t.co/AHAVunq26a#madhaloksabharesult #vijaysinhamohitepatil ##माझाखासदार #ResultsOnABP #ResultsOnABPMajha #loksabhaelecetion2024#ElectionsResults
— ABP माझा (@abpmajhatv) June 4, 2024
दरम्यान, कोल्हापूर, हातकणंगले, बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने जोरदार आघाडी घेतली आहे. कोल्हापूरमधून शाहू महाराज यांनी घेतलेली आघाडी पहिल्या फेरीपासून कायम आहे. हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांनी घेतलेली उमेदवार आघाडी सुद्धा कायम आहे.
Lok Sabha Result 2024 Live : बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांमध्ये काँटे की टक्कर; फक्त 19 हजार मतांनी सुप्रिया सुळे आघाडीवरhttps://t.co/FzUOpuMfw0#माझाखासदार #ResultsOnABP #ResultsOnABPMajha #loksabhaelecetion2024 #ElectionsResults pic.twitter.com/mMwUDpmegm
— ABP माझा (@abpmajhatv) June 4, 2024
दरम्यान, राज्यातच नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आघाडी कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. दुसरीकडे सातारामधील लढतीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीने जोरदार आघाडी घेतली आहे. साताऱ्यामधून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे आघाडीवर आहेत. पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार भाजपचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या