एक्स्प्लोर

Jayant Patil : तुतारी आणि पिपाणी चिन्हांमुळे मतदारांचा संभ्रम झाला; पिपाणीला दीड लाख मतं गेली; जयंत पाटीलांची स्पष्टोक्ती

निवडणुकांमध्ये तुतारी हे निवडणूक चिन्हं होते. तर त्या चिन्हांशी काहीसे साम्य असलेल्या पिपाणी देखील चिन्हं होता. या चिन्हांतील गोंधळाचा फटका आम्हाला बसला, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

मुंबईमहाराष्ट्र लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election 2024) आमचे तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्हं होते. तर त्या चिन्हांशी काहीसे साम्य असलेल्या पिपाणी देखील चिन्हं होता. या दोन चिन्हांतील गोंधळाचा फटका आम्हाला बसला आहे. परिणामी, पिपाणीला दीड लाख मतं गेली असून साताऱ्याची (Satara) सीट पडण्यास हे चिन्हंच कारणीभूत ठरल्याचा दावा,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. पिपाणीला दीड लाख मतं गेली आहेत. तर साताऱ्याची सीट 45 हजारांनी पडली, यात 37 हजार मतं पिपाणीला गेली आहेत.

तर बारामती, (Baramati Lok Sabha Election Result) बीड मधला माणूस उभा राहिला, त्याला बीएसपीपेक्षाही (BSP) अधिक मतं मिळाली असल्याची माहितीही  जयंत पाटील यांनी दिली आहे. आम्ही भाषण करायचो, तुतारी चिन्हं सांगायचो. पण लोकांमध्ये संभ्रम झाला आणि तुतारी समजून अनेकांनी पिपाणीवर बटन दाबले. याचा आम्हाला सर्वाधिक फटका बसला. मात्र, ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामुळे बळ 

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचार केल्याने महाविकास आघाडीला मोठं बळ मिळालं. 32 जागा आम्हाला मिळतील अशी अपेक्षा होती, एक दोन जागा सोडल्या तर जवळपास आकडा आम्हाला मिळाला आहे. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मी आणि आमचे युवा अध्यक्ष आम्ही गेलो होतो. दरम्यान, आम्हाला अडीच जिल्ह्यांचा पक्ष म्हणून हिणवले जायचं, मात्र आज आम्ही 8 जागा निवडून आणल्या आहेत. तर भाजपला 9 जागा मिळाल्या आहेत. तरीही आमेही त्यांना म्हणणार नाही की तो अडीच जिल्ह्यांचा पक्ष आहे.

आमचे 8 खासदार राज्याचे प्रश्न ठामपणाने मांडतील. कांदा, कपाशी, ऊसाचा अथवा शेतकऱ्याचे प्रश्न आम्ही लावून धरु. आता एक टप्पा झाला आहे. यात 80 टक्के स्ट्राइक रेट आम्ही दाखवलेला आहे. राज्यातले सरकार उखडून लावण्यासाठी आम्ही आमचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम उद्या जाहीर करु, अशी माहितीही  जयंत पाटील यांनी दिली. 

राज्याच्या कारभाराला लोकं कंटाळली

देवेंद्र फडणवीस यांनी उद्विग्न होऊन असे उद्गार का काढलेत हे माहिती नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. दिल्लीत बसलेले लोकं त्यांचे भविष्य ठरवू शकतात. मात्र,  महाराष्ट्रातली परिस्थिती, दोन पक्ष फोडल्यामुळे, सोबतच महागाई, बेकारी, जीएसटी यामुळे लोकं त्रस्त झाली होती. महाराष्ट्रातली कहाणी याच्याही पुढे आहे. राज्याच्या कारभाराला लोकं कंटाळली आहे. अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागल्या आहेत. लोकसभेसाठी देखील फडणवीस यांनी पूर्णपणे काम केलंय. मात्र आता तो त्यांचा तो निर्णय असल्याचे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे. 

सोडून गेलेले परत पवार साहेबांसोबत काम करण्यास इच्छुक 

आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यामुळे आमचा 80 टक्के स्ट्राईक रेट होता. आम्ही दोन जागा अधिक लढवल्या असत्या तर अधिक जागा मिळाल्या असत्या. 180 पेक्षा अधिक आमदार आमचे निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे विधानसभेला आता साडे तीन महिने आहेत. सुप्रिया सुळे यांना बारामतीत 48 हजारांचा लीड मिळाला आहे. कालच निकाल लागला आहे. त्यामुळे लोकांच्या वेगळ्या भावना आहेत.बरेचसे सोडून गेलेले नेते, आमदार, मंत्री म्हणत आहेत, आम्हाला परत पवार साहेबांसोबत काम करायचं आहे.मात्र, यासंदर्भात निर्णय झालेला नाही. जे तिकडे गेले, त्यांच्या मानसिकतेत बदल होताना दिसतोय, असं काल संध्याकाळपासून दिसतंय, असेही जयंत पाटील म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mohan Bhagwat Nagpur :  मतदान करणं हे नागरिकांचं कर्तव्य - मोहन भागवतC. P. Radhakrishnan Voting :  सी . पी. राधाकृष्णन यांनी केलं मतदानाचं आवाहनAashish Shelar Voting :  आशिष शेलार मतदान केंद्रावर दाखलMohan Bhagwat Vote :मोहन भागवतांनी नागपुरात केलं मतदान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget