Vidarbha Lok Sabha Election Result Winning List : विदर्भातील दहा मतदारसंघात कुणाच्या विजयाचा गुलाल? कोणाचा पराभव, तर कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Lok Sabha Election Result winner MP list Vidarbha : राज्यातील सर्व लोकसभा निवडणुकीचे अंतिम कौल आता हाती आले आहेत. अशातच विदर्भातील दहा मतदारसंघात विजयी सर्व उमेदवारांची माहितीही पुढे आली आहे.
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) आता हाती येऊ लागले आहे. त्यानंतर आता देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्रही स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या समोर आलेला मतदानाचा कल लक्षात घेता राज्यातल्या लोकसभा महालढतीचे अपेडेट्स क्षणाक्षणाला बदलताना दिसले आहे. अशातच विदर्भातील महायुतीला काहीसा धक्का बसताना दिसत आहे. विदर्भात सध्याघडीला महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे.
राज्यात महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 21 जागा या शिवसेना ठाकरे गटाने लढल्या. तर त्यानंतर काँग्रेसने 17 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या. तर दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक 23 जागा या भाजपने लढवल्या, तर शिंदे गटाने 15 आणि अजित पवारांनी चार जागा लढवल्या आहेत. तर त्यापैकी विदर्भात 10 मतदारसंघाचे अंतिम निकाल पुढे आले आहे.
विदर्भातील दहा मतदारसंघात कुणाच्या विजयाचा गुलाल?
राज्यासह विदर्भातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्यात थेट लढतीत गडकारींनी विजय माळ आपल्या गळ्यात घातली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील (Nagpur Lok Sabha Result 2024) पहिल्या फेरी पासून नितीन गडकरींची सरसी कायम असल्याचे चित्र होते. तर अखेरच्या फेरीत नितीन गडकारींनी आघाडी मिळवत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे अकोल्यातून भाजपचे अनुप धोत्रे विजयी झाले आहे. यात त्यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांचाही दणदणीत पराभव केला आहे. त्यामुळे चाळीशीतील अनुप धोत्रे या मतदारसंघात जायंट किलर ठरत पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव केला आहे. तर अमरवती, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली-चिमूर या मतदारसंघात देखील महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे.
लोकसभा मतदारसंघ | विजयी | पराभव | ||
1 | बुलडाणा | प्रतापराव जाधव | नरेंद्र खेडेकर | |
2 | अकोला | अनुप धोत्रे | प्रकाश आंबेडकर, अभय पाटील | |
3 | अमरावती | बळवंत वानखडे | नवनीत राणा | |
4 | वर्धा | अमर काळे | रामदास तडस | |
5 | रामटेक | श्याम बर्वे | राजू पारवे | |
6 | नागपूर | नितीन गडकरी | विकास ठाकरे | |
7 | भंडारा-गोंदिया | प्रशांत पडोळे | सुनील मेंढे | |
8 | गडचिरोली-चिमूर | नामदेव किरसान | अशोक नेते | |
9 | चंद्रपूर | प्रतिभा धानोरकर | सुधीर मुनगंटीवार | |
10 | यवतमाळ - वाशिम | संजय देशमुख | राजश्री पाटील |
इतर महत्वाच्या बातम्या