एक्स्प्लोर

Sangli Lok Sabha Election Result 2024 : 'अखेर नावापुढे 'खासदार' लागलं, मेहनत फळाला आली! विशाल पाटलांच्या पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Sangli Lok Sabha Election Result 2024 : या मतदारसंघात कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी बंड पुकारत अपक्ष निवडणुक लढवली होती. त्यामुळे हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता.

Sangli Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होत आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. दरम्यान काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सांगली लोकसभेच्या निकालाकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. सांगली लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव केला आहे. त्यांच्या विजयानंतर विशाल पाटलांच्या पत्नी पूजा पाटील (Pooja Patil) यांनी त्यांच्या पतीच्या नावाच्या पुढे खासदार लागल्याचा आनंद आहे असं म्हटलंय. या मतदारसंघात कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी बंड पुकारत अपक्ष निवडणुक लढवली होती. त्यामुळे हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत होता. दरम्यान विशाल पाटील विजयी झाल्याबद्दल पत्नी पूजा पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

सहाही मतदारसंघात विशाल पाटील आघाडीवर

निकाल हाती आल्यानंतर विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा खूप आनंदी दिसत होत्या. त्या म्हणाल्या, सगळ्यांचे कष्ट फळाला आलेत, अपक्ष उमेदवारांनी पाठिंबा दिला त्याबद्दल आनंद आहे. महिलांचे अनेक प्रश्न आहेत, तसेच पाण्यासंबंधित अनेक प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लावू अशी प्रतिक्रिया पूजा पाटील यांनी दिलीय. दरम्यान, सांगलीकर जनतेत निकालाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपचे संजय पाटील यांनी पोस्टल मतमोजणीत आघाडी घेतल्यानंतर पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर होते. त्यानंतर सहाही मतदारसंघात विशाल पाटील आघाडीवर होते. 

सांगली लोकसभेसाठी यंदा जवळपास 61 टक्के मतदान

सांगली लोकसभेसाठी यंदा जवळपास 61 टक्के मतदान झालं. त्यामध्ये खरी लढत ही अपक्ष विशाल पाटील आणि भाजपचे संजयकाका पाटील यांच्यात झाली. विविध एक्झिट पोलमध्येही विशाल पाटील हेच आघाडीवर असल्याचं सांगितलं गेलं. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रहार पाटलांना मदत न करता अपक्ष असलेल्या विशाल पाटलांना मदत केल्याचं उघड झालं.  

सर्वाधिक चर्चेतला मतदारसंघ

लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेला आणि जागावाटपामध्ये वादग्रस्त ठरलेला मतदारसंघ म्हणजे सांगली. महाविकास आघाडीने राज्यभर समन्वय साधून, भाजपविरोधात एकदिलाने काम केलं असलं तरी सांगलीत मात्र त्यांची दिलजमाई झाली नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यातील तिरंगी लढतीत विशाल पाटलांनी बाजी मारली.

सांगली लोकसभेचा 2019 सालचा निकाल

संजयकाका पाटील - भाजप - 5,08,995
विशाल पाटील - स्वाभिमानी - 3,44,643
गोपीचंद पडळकर - वंचित - 3,00,234
विजयी उमेदवार- संजयकाका पाटील, भाजप

हेही वाचा>>>

Sharad Pawar : ठाकरे आणि आम्ही जीवा-भावाप्रमाणे लढलो, आमचा स्ट्राईक रेट जास्त, पुढेही एकत्रच लढू : शरद पवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 November 2024Nawab Malik on Abu Azmi : फटीचर झालो तरी हात पसरत नाही,मलिक आझमींवर भडकलेAaditya Thackeray Bike Rally : प्रचाराचा शेवटचा दिवस, आदित्य ठाकरेंची भव्य बाईक रॅलीPratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
Embed widget