एक्स्प्लोर

विधानसभा निवडणूक 2019, राज्यभर मतदानाला सुरुवात

आज पावसाचा जोर कायम राहिला तर मतदारांना घराबाहेर कसं काढायचं असं आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. तिकडे मतदान सुरळीत पार पडावं यासाठी निवडणूक आयोग, पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहेत. लोकशाहीचा हा उत्सव सुरुळीत पार पडावा म्हणून 4 लाख पोलीस तर 6 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची फौज कामाला लागली आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज ( 21 ऑक्टोबर) मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. तरीही आज पावसाचा जोर कायम राहिला तर मतदारांना घराबाहेर कसं काढायचं असं आव्हान उमेदवारांसमोर असणार आहे. तिकडे मतदान सुरळीत पार पडावं यासाठी निवडणूक आयोग, पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहेत. लोकशाहीचा हा उत्सव सुरुळीत पार पडावा म्हणून 4 लाख पोलीस तर 6 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची फौज कामाला लागली आहे. तर तिकडे ज्यांचं राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे त्या उमेदवारांची धाकधूक नक्कीच वाढली आहे.  आज जवळपास पावणे नऊ कोटी मतदार सव्वा तीन हजार उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद करणार आहेत.

दरम्यान प्रशासनाकडून निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे.

एकूण मतदार :

  • महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार.
  • महाराष्ट्रात एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत.
  • यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750
  • महिला मतदार- 4 कोटी 28 लाख 43 हजार 635,
  • तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत.
  • दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत
  • सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत

मतदार जनजागृती :

  • आतापर्यंत 20.8 लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यापैकी १४.४० लाख मतदारांनी या यंत्रावर प्रत्यक्ष मतदानाची तालीम घेतली.

मतदान केंद्रे :

  • विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत.

मुख्य मतदान केंद्र – 95, 473

सहायक मतदान केंद्र – 1,188

  • खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदार केंद्रे’ स्थापन केली जातील.

मतदारांसाठी सोई-सुविधा

  • किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील.
  • दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा देण्यात आली आहे.
  • सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हील चेअर व रॅम्पची व्यवस्था
  • दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था.
  • अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रीत केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य.
  • लहान मुलासह मतदानास येणाऱ्या महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.

 दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्राची रचना

  • ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोईचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत.
  • पहिल्या वा दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रासाठी आहे, तिथे लिफ्टची व्यवस्था.

यंत्रणा सज्ज

  • विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट  (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.
  • विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

VIDEO | मतदानासाठी व्होटिंग कार्ड नसेल तर काय कराल? मतदारयादीत नाव कसं पाहाल? 

मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा

  • मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

मतदारांच्या सुविधेसाठी

  • आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲपची सुविधा उपलब्ध.
  • ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या नियंत्रणाकरिता GPS Tracking App,
  • मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाईन-1950.’ या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल.
  • मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ ही सुरु.
  • दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र

  • मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक.
  • भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.
  1. पासपोर्ट (पारपत्र)
  2. वाहन चालक परवाना

3. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,  सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)

  1. छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक
  2. पॅनकार्ड
  3. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
  1. मनरेगा जॉबकार्ड
  2. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
  3. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
  4. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
  5. आधारकार्ड

निवडणूक कामकाजासाठी एसटीच्या 10 हजार 500 बसेस आरक्षित...!

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक निवडणूक प्रशासनाने राज्यातील विविध विभागात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 10 हजार 500 बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. त्यामुळे उद्या एसटीच्या राज्यभरातील विविध मार्गावरील सुमारे 18 हजार दैनंदिन फेऱ्या पैकी 5 हजार फेऱ्या अंशत: अथवा पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांच्या होणाऱ्या संभाव्य गैरसोयीबद्दल महामंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे. एसटीच्या फेऱ्या कमी होणार असल्या तरी 21 तारखेला मतदांनासाठी सार्वजनिक सुट्टी तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील सुट्टी असल्याने त्याचा विपरीत परिणाम दैनंदिन वाहतुकीवर होणार नाही. दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने प्रवाशांची गैरसोय होऊ नये या दृष्टीकोनातून आवश्यक त्या मार्गावर बसेस सोडण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. ज्या मार्गावर दिवसभरात जास्त फेऱ्या आहेत अशा मार्गावरील फेऱ्या कमी करून, एखाद दुसरी फेरी असणाऱ्या मार्गावर सोडण्यात याव्यात. तसेच कोणत्याही मार्गावरील अत्यावश्यक फेऱ्या बंद न करण्याचे निर्देशही एसटी प्रशासनाकडून दिले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Car Accident Rap Song : पैसे मेरे बाप के...दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचं रॅप साँगPune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅपPune Porsche Car Accident Accused Rap Song :जामीन मिळाल्याचा घमंड,  दोघांना चिरडल्यानंतर आरोपीचा रॅप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
SDRF बोट दुर्घटनेनंतर स्थानिकांचा आक्रमक पवित्रा, थेट पालकमंत्री विखे पाटलांचा ताफा अडवला
Embed widget