एक्स्प्लोर
काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, माणिकरावांसह एकनाथ गायकवाडांना उमेदवारी
काँग्रेसच्या महाराष्ट्रातील दुसऱ्या उमेदवार यादीत सात जागांचा समावेश आहे. मुंबई दक्षिण मध्य मधून एकनाथ गायकवाड यांना, तर यवतमाळ-वाशिममधून माणिकराव ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. नऊ जणांपैकी महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश या यादीत आहे. मुंबई दक्षिण मध्य मधून एकनाथ गायकवाड यांना, तर यवतमाळ-वाशिममधून माणिकराव ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवार यादी नंदुरबार - के. सी. पडवी धुळे - कुणाल रोहिदास पाटील वर्धा - चारुलता टोकस मुंबई दक्षिण मध्य - एकनाथ गायकवाड यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे शिर्डी- भाऊसाहेब कांबळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नवीनचंद्र बांदिवडेकर कोणासोबत सामना होण्याची शक्यता? मुंबई दक्षिण मध्य - शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे विरुद्ध एकनाथ गायकवाड यवतमाळ-वाशिम - शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी विरुद्ध विधान परिषदेचे आमदार माणिकराव ठाकरे रत्नागिरी-सिंधुदुर्ग - शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत विरुद्ध नवीनचंद्र बांदिवडेकर
लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार याआधी काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले होते. पहिली उमेदवार यादी नागपूर - नाना पटोले सोलापूर - सुशीलकुमार शिंदे मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त मुंबई दक्षिण - मिलिंद देवरा गडचिरोली-चिमूर - डॉ. नामदेव उसेंडी
लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार याआधी काँग्रेसने महाराष्ट्रातील पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले होते. पहिली उमेदवार यादी नागपूर - नाना पटोले सोलापूर - सुशीलकुमार शिंदे मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त मुंबई दक्षिण - मिलिंद देवरा गडचिरोली-चिमूर - डॉ. नामदेव उसेंडी आणखी वाचा




















