एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Consituency 2024 : अखेर भुजबळांनी अटीतटीच्या लढतीत मारली बाजी, येवल्याचा गड राखला कायम, माणिकराव शिंदे पराभूत

Yeola Assembly Constituency : 2019 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत भुजबळ यांना 1 लाख 26 हजार 237 मते मिळाली.

नाशिक : येवला म्हटलं की पैठणी साडी डोळ्यांसमोर येते. पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला मतदारसंघात माळी, विणकरी, मराठी, वंजारी या समाजाचे प्राबल्य दिसून येते. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा बालेकिल्ला म्हणूनही येवला विधानसभा मतदारसंघाची (Yeola Assembly Constituency) ओळख आहे. महायुतीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येवला विधानसभेचा गड  छगन भुजबळ राखणार की माणिकराव शिंदे बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्रा छगन भुजबळ यांनी आपला गड कायम राखत माणिकराव शिंदे यांचा परभव केलाय.

येवला मतदारसंघ हा सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर शिवसेनेने या ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 2004 साली छगन भुजबळ यांनी येवल्यात एन्ट्री घेतली. मंत्री भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून येवला मतदारसंघाची ओळख झाली. गेल्या चार पंचवार्षिकपासून भुजबळ येवल्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

2004 पासून छगन भुजबळांचे येवल्यावर वर्चस्व

2004 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार कल्याणराव पाटील यांचा पराभव केला होता. भुजबळ यांना 79 हजार 306 तर कल्याणराव पाटील यांना 43 हजार 657 मते मिळाली होती. 2009 मध्ये भुजबळ यांनी 1 लाख 6 हजार 416 मतं मिळवत शिवसेनेच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला. 2014 सालच्या निवडणुकीत 1 लाख 12 हजार मिळवत छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. पवार यांना या निवडणुकीत 66 हजार 345 मते मिळाली. तर 2019 मध्ये भुजबळ यांनी पुन्हा शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत भुजबळ यांना 1 लाख 26 हजार 237 मते मिळाली. तर पवार यांना 69 हजार 712 मते मिळाली होती.

छगन भुजबळांची राज्यभर चर्चा

छगन भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते अजित पवारांबरोबर सत्तेत सहभागी झाले. तसेच मराठा आरक्षण प्रश्नावरून मनोज जरांगेंशी झालेल्या वादांवरुन आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामुळे भुजबळांची राज्यभरात चर्चा झाली आहे. आता अजित पवार यांच्याकडून छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात अजून महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. 

छगन भुजबळांचा विजय

दरम्यान, महाविकास आघाडीत येवल्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला गेली आहे. मात्र, काँगेस आणि शिवसेना (उबाठा) पक्षानेही येवल्याच्या जागेवर दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे उमेदवारीसाठी गर्दी दिसून आली. अॅड. माणिकराव शिंदे, जयदत्त होळकर, उषाताई शिंदे, सानीया होळकर, गोरख पवार, सचिन आहेर आदी प्रमुख इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी मुलाखतीही दिल्या होत्या. तर शिवसेना ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख कुणाल दराडे आपले काका शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात आले होते. मात्र शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. येवल्याची लढत अत्यंत चुरशीची झाली होती. मात्र छगन भुजबळ यांनी बाजी मारली.

आणखी वाचा

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात हिरामण खोसकर बाजी मारणार की लकी जाधव?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, 5 लाख महिलांची नावे वगळण्यावरून जयंत पाटील सरकारवर कडाडले!
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, 5 लाख महिलांची नावे वगळण्यावरून जयंत पाटील सरकारवर कडाडले!
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?  जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता
जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता, शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?
Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांची जवळीक वाढली, दोन महिन्यांत राजकारणात मोठे बदल होणार: अंजली दमानिया
अजितदादांशी फडणवीसांची जवळीक वाढली, एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री, राज्यात पुन्हा भूकंप?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 | आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8.00AM TOP Headlines 08.00AM 12 February 2025Top 70 | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, 5 लाख महिलांची नावे वगळण्यावरून जयंत पाटील सरकारवर कडाडले!
'लाडकी बहीण'चा ठिबक सिंचन योजनेला फटका, 5 लाख महिलांची नावे वगळण्यावरून जयंत पाटील सरकारवर कडाडले!
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शिंदेंचा काँग्रेसला मोठा धक्का, नाशिकमधील बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंचे दोन माजी नगरसेवकही गळाला
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?  जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता
जागतिक बाजारातून चांगले संकेत, सेन्सेक्स निफ्टी पुन्हा वेग पकडण्याची शक्यता, शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागणार?
Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस अन् अजित पवारांची जवळीक वाढली, दोन महिन्यांत राजकारणात मोठे बदल होणार: अंजली दमानिया
अजितदादांशी फडणवीसांची जवळीक वाढली, एकनाथ शिंदेंच्या योजनांना कात्री, राज्यात पुन्हा भूकंप?
Share Market Sensex: शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
शेअर मार्केटमध्ये 2008 पेक्षा वाईट वेळ येणार? गुंतवणुकदारांना बाजारातून पैसे काढण्याचा सल्ला
Stock Market Crash: केवळ पाच दिवसात 18 लाख कोटी स्वाहा, स्टॉक मार्केटमध्ये धूळधाण, शेअर मार्केट इतकं का पडलं?
शेअर मार्केटमध्ये लाल चिखल, गुंतवणूकदारांनी 18 लाख कोटी गमावले, घसरणीची नेमकी कारणं कोणती?जाणून घ्या
HSC Exam : परीक्षा एकाची अन् इंग्रजीच्या पेपरला बसवले दुसऱ्यालाच, एका चुकीनं बिंग फुटलं, तोतया परीक्षार्थीवर गुन्हा दाखल
बारावीच्या परीक्षेत हेराफेरी, इंग्रजीच्या पेपरला तोतया परीक्षार्थी बसला, एका चुकीनं बिंग फुटलं अन्... 
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
Embed widget