BJP Candidate List : भावासाठी निवडणुकीतून माघार, पण भाजपच्या उमेदवारांच्या यादीत आले नाव, राहुल आहेर नेमका काय निर्णय घेणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत राहुल आहेर यांच्या नावाचाही समावेश आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल वाजले आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. आज भारतीय जनता पक्षाकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत चांदवड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, राहुल आहेर यांचे भाऊ केदा आहेर हे चांदवडमधून निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने दोन दिवसांपूर्वीच राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र भाजपच्या यादीत राहुल आहेर यांचे नाव आल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
चांदवड-देवळा मतदारसंघात (Chandwad Deola Assembly Constituency) राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. गेल्या दोन पंचवार्षिक डॉ. राहुल आहेर हे भाजपचे आमदार आहे. भाजपच्या (BJP) तिकिटासाठी विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर (Dr Rahul Aher) व नाफेडचे संचालक केदा आहेर (Keda Aher) या दोघात भावात जोरदार रस्सीखेच दिसून आली. यानंतर डॉ. राहुल आहेर यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. केदा आहेर यांना चांदवड-देवळा मतदारसंघाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली. वरिष्ठांकडूनही या निर्णयाला संमती दिल्याचे देखील डॉ. राहुल आहेर यांनी सांगितले होते.
राहुल आहेर नेमका काय निर्णय घेणार?
आता चांदवडमधून पुन्हा आमदार डॉ. राहुल आहेर यांना भाजपची उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या 99 जणांच्या यादीत डॉ. राहुल आहेर यांचे ४७ नंबरला नाव आहे. राहुल आहेर यांचे नाव जाहीर झाल्याने भाजप कार्यकर्ते संभ्रमात पडल्याचे दिसून येत आहे. तर आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राहुल आहेर नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपची उमेदवारांची यादी
नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा - राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर -अनुप अग्रवाल
सिंदखेडा - जयकुमार रावल
शिरपूर - काशीराम पावरा
रावेर - अमोल जावले
भुसावळ - संजय सावकारे
जळगाव शहर - सुरेश भोळे
चाळीसगाव - मंगेश चव्हाण
जामनेर -गिरीश महाजन
चिखली -श्वेता महाले
खामगाव - आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) - संजय कुटे
अकोला पूर्व - रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे - प्रताप अडसद
अचलपूर - प्रवीण तायडे
देवली - राजेश बकाने
हिंगणघाट - समीर कुणावार
वर्धा - पंकज भोयर
हिंगना - समीर मेघे
नागपूर दक्षिण - मोहन माते
नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे
तिरोरा - विजय रहांगडाले
गोंदिया - विनोद अग्रवाल
अमगांव - संजय पुरम
आर्मोली - कृष्णा गजबे
बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार
चिमूर - बंटी भांगडिया
वाणी - संजीवरेड्डी बोडकुरवार
रालेगाव - अशोक उडके
यवतमाळ - मदन येरवर
किनवट - भीमराव केरम
भोकर - क्षीजया चव्हाण
नायगाव - राजेश पवार
मुखेड - तुषार राठोड
हिंगोली - तानाजी मुटकुले
जिंतूर - मेघना बोर्डीकर
परतूर - बबनराव लोणीकर
बदनापूर -नारायण कुचे
भोकरदन -संतोष दानवे
फुलंब्री - अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
गंगापूर - प्रशांत बंब
बगलान - दिलीप बोरसे
चंदवड - राहुल अहेर
नाशिक पुर्व - राहुल ढिकाले
नाशिक पश्चिम - सीमाताई हिरे
नालासोपारा - राजन नाईक
भिवंडी पश्चिम - महेश चौघुले
मुरबाड - किसन कथोरे
कल्याम पूर्व - सुलभा गायकवाड
डोंबिवली - रवींद्र चव्हाण
ठाणे - संजय केळकर
ऐरोली - गणेश नाईक
बेलापूर - मंदा म्हात्रे
दहिसर - मनीषा चौधरी
मुलुंड - मिहिर कोटेचा
कांदिवली पूर्व - अतुल भातखलकर
चारकोप - योगेश सागर
मालाड पश्चिम - विनोद शेलार
गोरेगाव - विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम - अमित साटम
विले पार्ले - पराग अलवणी
घाटकोपर पश्चिम - राम कदम
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
वडाळा - कालिदास कोळंबकर
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
कुलाबा - राहुल नार्वेकर
पनवेल - प्रशांत ठाकूर
उरन - महेश बाल्दी
दौंड- राहुल कुल
चिंचवड - शंकर जगताप
भोसली -महेश लांडगे
शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोले
कोथरुड - चंद्रकांत पाटील
पर्वती - माधुरी मिसाळ
शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव - मोनिका राजले
राहुरी शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते
कर्जत जामखेड - राम शिंदे
केज - नमिता मुंदडा
निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
औसा - अभिमन्यू पवार
तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
मान -जयकुमार गोरे
कराड दक्षिण - अतुल भोसले
सातारा - शिवेंद्रराजे भोसले
कणकवली - नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक
इचलकरंजी - राहुल आवाडे
मिरज - सुरेश खाडे
सांगली - सुधीर गाडगीळ
आणखी वाचा