Kolhapur News: कोल्हापुरात मुलाच्या वाढदिवसाची पार्टी वडिलांसाठी अखेरची ठरली, किरकोळ वादात मित्रांनीच डोक्यात दगड घातला
Kolhapur News: मृत लखन बागडी यांच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी पाच मित्रांसह कृष्णा नदीच्या काटालगत सर्वजण गेले होते. यावेळी किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला

Kolhapur News: मुलाच्या वाढदिवसाची पार्टी वडिलांसाठी अखेरची ठरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगावमध्ये मुलाच्या पार्टीदरम्यान मित्रांनीच पार्टी देणाऱ्या वडिल लखन बागडी यांची हत्या केल. या घटनेमुळे जयसिंगपूर आणि उदगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत लखन बागडी यांच्या मुलाच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी पाच मित्रांसह कृष्णा नदीच्या काटालगत सर्वजण गेले होते. यावेळी किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यवसन थेट डोक्यात दगड घालण्यात झाले.
मित्रानेच डोक्यात दगड घातला
पार्टीमध्ये किरकोळ कारणातून वाद वाढत गेल्यानंतर मित्रांमधील एकाने लखन यांच्या डोक्यात दगड घातला. डोक्यात गंभीर इजा झाल्याने लखन यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय माने, संकेत हंबर, अमिन रजपूत, अमित सांगावकर, प्रथमेश पवार, अरविंद माळी अशी गुन्हा दाखल झालेल्या मित्रांची नावं आहेत. त्यामधील चौघांना काल रात्री उशिरा अटक केली आहे.
जयसिंगपुरात चार दिवसात दुसरा खून
जयसिंगपूरमध्ये चार दिवसांपूर्वीच खुनाची घटना घडली होती. दिवाळीमध्येच सुनील पाथरवट यांचा खून झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा आता खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे परिसरातील वाढती गुन्हेगारी अधोरेखित झाली आहे.
कोल्हापुरात खुनी हल्ला
दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात वाहतूक कोंडीतील भांडणात माझी रिक्षा तेवढी येथून घेऊन जातो, असे म्हणताच झालेल्या वादात फळविक्रेता अरबाज फयाज बागवान (वय 27 रा. रेडेकर गल्ली, लक्षतीर्थ वसाहत, सध्या रा. फायर स्टेशनजवळ, फुलेवाडी, कोल्हापूर) याच्यावर एडका, कोयत्याने खुनी हल्ला झाला. याप्रकरणी अक्षय आनंदा ओतारी ( वय 26, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर-गगनबावडा रोडवर खांडसरी फाटा येथील हॉलसमोर ही घटना घडली.
खानसरी फाट्यावरील खुनी हल्ला प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे. आनंद मुकुंद ओतारी (वय 53, रा. बालिंगा, ता. करवीर) यांच्या फिर्यादीवरून आरबाज बागवान याच्याविरोधात शुक्रवारी करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचा मुलगा अक्षयवर आरबाज याने चाकू हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























