एक्स्प्लोर

Nashik Crime: नाशिकच्या कारागृहात खळबळजनक घटना! कैद्याने कारागृहातच संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?

Nashik Crime: नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका बंदीवानाने टोकाचे पाऊल उचलले आहे.

Nashik Crime: नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central jail) शिक्षा भोगत असलेल्या एका बंदीवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 26 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. शिवदास भालेराव (वय 58, कैदी क्रमांक यूटी-802) असे मृत्युमुखी पडलेल्या बंदीवानाचे नाव आहे.

सिन्नर तालुक्यातील रहिवासी असलेले भालेराव याला एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (बलात्कार) केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि जून 2024 पासून तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.

Nashik Crime: कारागृहातच घेतला गळफास

रविवारी दुपारच्या सुमारास भालेराव याने कारागृहातील एका ठिकाणी कशाच्या तरी साहाय्याने गळफास घेतल्याचे कारागृह प्रशासनाच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच कारागृहातील पोलीस अंमलदारांनी तातडीने त्यांना खाली उतरवून शासकीय जिल्हा रुग्णालयात सव्वा तीनच्या सुमारास दाखल केले. मात्र, तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून कैद्याला मृत घोषित केले.

Nashik Police: पोलिसांकडून पुढील तपास

या घटनेची नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि कारागृह प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Road Jail: कारागृहातील 'त्या' व्हायरल व्हिडीओ प्रकरणात गुन्हा दाखल

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील काही कैदी सुरक्षेचा फज्जा उडवत अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये मातीच्या चिलीमचा वापर करत अमली पदार्थ ओढताना दिसणारे दृश्य, तसेच कैद्यांकडून मोबाईल फोनवर शूट केलेल्या रील्स व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकाराची दखल घेत नाशिकरोड पोलिसांनी 5 ते 6 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासात हे व्हिडीओ मागील वर्षीचे असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, इतक्या गंभीर प्रकारानंतरही कारागृह प्रशासनाकडून वर्षभरात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, हे विशेष लक्ष वेधणारे ठरले होते. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

आणखी वाचा 

Nashik Crime: मी चुकलो, तुम्ही चुकू नका! नाशिक पोलिसांच्या दणक्यानंतर शिंदे गटाच्या फरार नेत्याचा माफीनामा; म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget