एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र पार्श्वभूमीवर IANS-Matrize चा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत महायुतीला राज्यात चांगले यश मिळत असल्याचे दिसून येते.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात एकीकडे महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे  प्रहारचे बच्चू कडू आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीला सामोरे जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. या पार्श्वभूमीवर IANS-Matrize चा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेत महायुतीला राज्यात चांगले यश मिळत असल्याचे दिसून येते. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले अजित पवार? 

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे आले असता त्यांना या सर्व्हेबाबत विचारण्यात आले. यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही आमचं काम करतोय. आम्ही राहिलेल्या दिवसात लोकांपर्यंत पोहोचणे आणि 175 पर्यंत जागा मिळवणे हा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

काय म्हणाले संजय राऊत ? 

संजय राऊत म्हणाले की, सर्व्हे कोणाचे येत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवावा, अशी परिस्थिती नाही. लोकसभेला सर्व्हे आले होते. महाविकास आघाडीला दहा जागा मिळणार नाही. पण, आम्ही 31 जागा जिंकलो. आता कुठून कुठून काय सर्व्हे करतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील हे सांगता येत नाही. महाराष्ट्रातील मतदार जागृत आहेत. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळत आहेत. आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. पैशाचे वाटप, ईव्हीएमचा विषय हरियाणाच्या निवडणुकीत आला होता. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा आताचे सरकार येणार नाही. मोदी-शाह यांच्या कृपेने बसलेले हे सरकार पुन्हा निवडून येणार नाही, याची आम्हाला खात्री आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

IANS-Matrize च्या सर्व्हे

'आयएएनएस'च्या सर्व्हेनुसार राज्यातील सर्व म्हणजे 288 मतदारसंघांचा आढावा घेतल्यास महायुतीची बाजू भक्कम दिसत आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 145 ते 165 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला 106 ते 126 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, राज्यात कोणाला किती जागा मिळणार आणि कुणाचे सरकार येणार? याचे चित्र 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. 

आणखी वाचा 

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात 20 ते 38 जागा, मराठवाड्यात मविआला 20 ते 24 जागा; मुंबईत कोण वरचढ? IANS-Matrize चा सर्व्हे समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
Amit Shah: आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah : सांगलीतल्या सभेत अमित शाहांचं सूचक वक्तव्य, 2 दिवसांत शाहांना सूर का बदलावे लागले?Shivani Vijay Wadettiwar  : वीज गेल्यामुळे काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवारांची भर सभेत शिवीगाळSudhakar Kohale Nagpur :  काँग्रेसच्या आरोपाला भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंचं प्रत्युत्तरTuljapur Rana Jagjit Singh :'ठाकरेंनी तुळजाभवानी मंदिर विकासासाठी एक रुपयाही दिला नाही'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
Amit Shah: आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतचं वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल, निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतची टिप्पणी भोवली, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Vidhan Sabha Elections 2024: काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला, 28 नेत्यांना दणका
काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
देवेंद्र फडणवीस तुम्हाला औरंगाबादमध्ये जे आणायचं ते येणार नाही, तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावर माती पडेल: असदुद्दीन ओवेसी
फडणवीस तुम्ही माझा सामना करु शकत नाही, तुमचे नव्हे आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले होते: असदुद्दीन ओवेसी
Embed widget