Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
Nashik District Assembly Election 2024 : नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघात 196 उमेदवार रिंगणात आहेत. आज सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 288 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघात 196 उमेदवार रिंगणात आहेत. आज सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून मतदानासाठी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात सरासरी 32.35 मतदान झाले आहे. यात दिंडोरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. तर आतापर्यंत बागलाण विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघाची दुपारी 1 वाजेपर्यंतची आकडेवारी
- नांदगाव : 30.16
- मालेगाव मध्य : 35.82
- मालेगाव बाह्य : 27.76
- बागलाण : 27.34
- कळवण : 36.15
- चांदवड : 34.19
- येवला : 35.86
- सिन्नर : 36.40
- निफाड : 31.80
- दिंडोरी : 43.29
- नाशिक पूर्व : 28.21
- नाशिक पश्चिम : 30.27
- नाशिक मध्य : 28.34
- देवळाली : 28.19
- इगतपुरी : 34.98
नांदगावमध्ये जोरदार राडा
दरम्यान, नांदगाव विधानसभा मतदारसंघात (Nandgaon Vidhan Sabha Constituency) अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यात जोरदार राडा झाला. यावेळी आक्रमक झालेल्या सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांनी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे समीर भुजबळ यांनी देखील सुहास कांदेंना प्रत्युत्तर दिले. नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अचानक अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला होता. मतदारांना जावू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा समीर भुजबळांनी घेतला होता. यानंतर घटनास्थळी सुहास कांदे दाखल झाले. यावेळी दोन्ही गटामध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
जळगावमध्ये किती मतदान?
जिल्ह्याची सरासरी टक्केवारी – 27.88%
मतदार संघनिहाय टक्केवारी
अमळनेर -28.54%
भुसावळ -28.29 %
चाळीसगाव -30.57%
चोपडा -28.54%
एरंडोल- 26.73%
जळगाव सिटी- 26.57 %
जळगाव ग्रामीण -30.27%
जामनेर -29.43%
मुक्ताईनगर- 28.69%
पाचोरा -17.95%
रावेर - 33.99 %
इतर महत्त्वाच्या बातम्या
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल