एक्स्प्लोर

Maharashtra Exit Poll : महायुतीची झोप उडवणारा 'एबीपी माझा'चा पोल समोर, सोशल मीडियावर लोकांचा मूड काय?

ABP Majha Social Media Exit Poll : अनेक माध्यमांचे एक्झिट पोल महायुतीच्या बाजूने झुकणारे असले तरी सोशल मीडियावर मात्र लोकांचा मूड वेगळाच असल्याचं दिसतंय.

मुंबई : महाराष्ट्राच्या महानिकालाला अवघा काहीच वेळ शिल्लक असताना आता सोशल मीडियावर त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. निकालाच्या दिवशी आलेल्या एक्झिट पोलमुळे अनेकांची झोप उडाल्याचं दिसून आलं. आता तशीच झोप एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर घेण्यात आलेल्या पोलमुळे उडू शकते असं दिसतंय. एबीपी माझाच्या सोशल मीडियावर घेण्यात आलेल्या पोलमधून (ABP Majha Social Media Exit Poll) बहुसंख्य लोकांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

YouTube वर लोकांचा कल काय?

यूट्यूबवर आतापर्यंत 2 लाख 32 हजार लोकांनी आपला कल नोंदवला. त्यापैकी 63 टक्के लोकांनी महाविकास आघाडीची सत्ता येणार असल्याचं सांगितलं. तर 32 टक्के लोकांनी महायुती सरकार सत्तेत येणार असं सांगितलं. उर्वरित पाच टक्के लोकांनी राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण होईल असं सांगितलं.

  • महायुती  :  32%
  • महाविकास आघाडी  : 63%
  • त्रिशंकू  :  5%
  • एकूण मतं :  232K

Facebook वर लोकांचा कल काय? 

फेसबूकवर एकूण 1024 लोकांनी आपला कल नोंदवला असून त्यापैकी 52 टक्के लोकांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असं म्हटलंय. तर 41 टक्के लोकांना महायुती सरकार सत्तेत येणार असं सांगितलं. सात टक्के लोकांना राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असं वाटतंय. 

  • महायुती  : 41%
  • महाविकास आघाडी  : 52%
  • त्रिशंकू  : 7%
  • एकूण मतं :  1024

Instagram वर लोकांचा कल काय?

इन्स्टाग्रामवर मात्र याच्या विरोधात कल असल्याचं दिसून आलं. इन्स्टाग्रामवर 22 हजार 714 लोकांनी आपला कल नोंदवला असून 49 लोकांनी राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येणार असल्याचं सांगितलं. तर 44 टक्के लोकांनी महाविकास आघाडी सरकार येईल असं सांगितलं. सात टक्के लोकांना राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असा कल नोंदवला. 

  • महायुती  :  49%
  • महाविकास आघाडी  : 44%
  • त्रिशंकू  : 7%
  • एकूण मतं :  22,714

Xवर (ट्विटर) लोकांचा कल काय? 

ट्विटर म्हणजे आताच्या X प्लॅटफॉर्मवर लोकांनी महाविकास आघाडीकडे कल नोंदवला आहे. X वर 56.5 टक्के लोकांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल असं सांगितलं. तर 30.2 टक्के लोकांनी महायुतीकडे कल नोंदवला. 13.3 टक्के लोकांनी राज्यात त्रिशंकू सरकार सत्तेत येईल असं म्हटलंय.

  • महायुती  :  30.2%
  • महाविकास आघाडी  : 56.5%
  • त्रिशंकू  :  13.3%
  • एकूण मतं :  669

ही बातमी वाचा : 

महत्त्वाच्या बातम्या

Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget