(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhajinagar Marathwada Region Election Results 2024: औरंगाबाद पश्चिममध्ये शिंदे गटाला धक्का, सिल्लोडमध्येही चित्र पालटलं, कोणाची आघाडी कोणाची पिछाडी?
Marathwada Region Election Results 2024:मराठवाड्यात पोस्टल मतमोजणीत आलेल्या पहिल्या कलात महायुती आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
Marathwada Region Election Results 2024:महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अतिथटीच्या लढतीनंतर मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष आहे. महाराष्ट्र विधानसभांच्या पोस्टल मतमोजणीचा पहिला कल हाती येत आहे. निवडणूक आयोगाकडून हाती आलेल्या पहिल्या कलात औरंगाबाद पश्चिम मतदार संघात शिंदे गटाला मोठा धक्का बसताना दिसतोय. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी आग्रही असणारे संजय शिरसाट पिछाडीवर असल्याचे समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या विधानसभेच्या लढतीत संजय शिरसाठ हे शिंदे गटाचे महत्त्वाचे नेते आहेत.
मराठवाड्यात पोस्टल मतमोजणीत आलेल्या पहिल्या कलात महायुती आघाडीवर असल्याचे चित्र असून भाजप आणि शिंदे गटाला 35 जागा मिळाल्याचं चित्र आहे. दरम्यान औरंगाबाद पश्चिममध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत अतिथटीची होत असल्याचे चित्र आहे.
औरंगाबाद पश्चिम मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना
औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाल्यानंतर मतमोजणीच्या फेऱ्या सुरू झाल्या असून पहिले कल हाती आले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात राजू शिंदे हे उमेदवार असून शिंदे गटाकडून संजय शिरसाट उमेदवार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर औरंगाबाद पश्चिम ची जागा ही शिंदे गटासाठी महत्त्वाची मानली जाते. औरंगाबाद पश्चिम मध्ये सध्या ठाकरे गटासाठी आनंदाची बातमी असून राजू शिंदे यांची सरशी होताना दिसते. हा शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाठ हे पिछाडीवर असल्याचं समजतंय.
सिल्लोड मतदारसंघात अब्दुल सत्तार पिछाडीवर
छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत आहे. निवडणूक आयोगाच्या मतमोजणीचा पहिल्या कलानुसार सिल्लोड मतदारसंघात अब्दुल सत्तार पिछाडीवर असल्याचं समजत आहे.