Maharashtra Assembly Election Results 2024: औरंगाबाद पूर्वमध्ये MIM चा बोलबाला, भाजपाच्या अतुल सावेंना फक्त 216 मतं, इम्तियाज जलील सुस्साट!
Maharashtra Election Result 2024 Live: औरंगाबाद पूर्व मतदार संघात काटे की टक्कर सुरू असल्याचा दिसून येत आहे. भाजपचे अतुल सावे सध्या पिछाडीवर असून त्यांच्यासमोर इम्तियाज जलील यांचे मोठे आव्हान आहे.
Aurangabad East Maharashtra Assembly Election result 2024: राज्यातील 288 विधानसभा मतदार संघातील मतमोजणीचे कल हाती येत आहेत. 288 पैकी भाजपने शंभरी ओलांडली असून शिंदेसेनेने 50 चा आकडा पार केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटानेही साधारण 30 च्या पुढे जागांवर आघाडी मिळवल्याचे चित्र आहे. दरम्यान, मराठवाड्यातील 46 मतदारसंघातील मतमोजणीचे कल हाती येत आहेत. यात महायुतीची सरशी होताना दिसत असून 46 पैकी 35 च्या पुढे जागा महायुतीकडे सरकताना दिसतात. तर महाविकास आघाडीला साधारण सहा ते आठ जागा मिळू शकतात असे चित्र दिसत आहे. दरम्यान औरंगाबाद पूर्व मतदार संघात काटे की टक्कर सुरू असल्याचा दिसून येत आहे. भाजपकडून उभारलेले अतुल सावे सध्या पिछाडीवर असून त्यांच्यासमोर एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचे मोठे आव्हान आहे.
इम्तियाज जलील आघाडीवर ,अतुल सावे चौथ्या क्रमांकावर !
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत आहे . भाजपकडून उभे असलेले अतुल सावे सध्या पिछाडीवर असून त्यांच्यासमोर इम्तियाज जलील यांचे मोठे आव्हान आहे . तर काँग्रेसकडून लहू शेवाळेही रिंगणात आहेत . औरंगाबाद पूर्व मतदारसंघात इम्तियाज जलील यांना मानणारा मोठा वर्ग आहे . त्यामुळे अतुल सावे यांच्यासमोर जलील यांचे आव्हान आहे . अतुल सावे सध्या चौथ्या क्रमांकावर असून इम्तियाज जलील आघाडीवर असल्याचं दिसतंय . भाजपाच्या अतुल सावेंना फक्त 216 मतं मिळाल्याचं चित्र आहे. दोन जागांवर एमआयएमला आघाडी असल्याचं चित्र आहे. दरम्यान औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रदीप जैसवाल
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात काय स्थिती?
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात २०१९ च्या विधानसभेत भाजपच्या अतूल सावे यांनी एमआयएमच्या डॉ कादरी गफार यांचा पराभव करत विजय मिळवला होता. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघातून भाजपचे नेते व मंत्री अतुल सावे २०१९ मध्ये विजयी झाले होते. यावेळीही भाजपकडून अतुल सावेंना उमेदवारी आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर MIM कडून इम्तियाज जलील पूर्व विधानसभा मतदारसंघातून यंदा निवडणुकीत उभारले आहेत. तर काँग्रेसकडून लहु शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाची निवडणुक चुरशीची होत असून निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.