छगन भुजबळ आणि विरोधी उमेदवार माणिकराव शिंदे समोरासमोर, दोघांनीही हस्तांदोलन करत केली विचारपूस
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि विरोधी उमेदवार माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) हे आज एका मतदान केंद्रावर समोरासमोर आले होते. यावेळी दोन्ही उमेदवारांनी हस्तांदोलन करत ऐकमेकांची विचारपूस केली.
Maharashtra Assembly Election 2024 Yeola Constituency : येवला विधानसभा मतदारसंघाचे (Yeola Vidhansabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि विरोधी उमेदवार माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) हे आज एका मतदान केंद्रावर समोरासमोर आले होते. यावेळी दोन्ही उमेदवारांनी हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच मतदानासंदर्भात विचारपूस देखील केली. एका बाजूला नांदगांव विधानसभा मतदारसंघात समीर भुजबळ आणि सुहास कांदे एकमेकांवर धावून जात असतानाच दुसरीकडे हे चित्र पाहायला मिळालं.
दोन्ही उमेदवारांनी हस्तांदोलन करत विचारपूस केली
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यावेळी उमेदवार विविध ठिकाणी जाऊन मतदान केंद्राला गाठीभेटी देत आहेत. आज येवला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांनी नगरसुल येथील मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांची विरोधी उमेदवार माणिकराव शिंदे यांची भेट झाली. यावेळी दोन्ही उमेदवारांनी हस्तांदोलन करत विचारपूस केली. ऐकमेकांना शुभेच्छा दिल्या. काय माणिकराव कसं चाललंय? कुठे कुठे जाऊन आलात? असे म्हणत छगन भुजबळांनी माणिकराव शिंदे यांची विचारपूस केली. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
येवला मतदारसंघात रंगतदार लढत होणार?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला म्हणूनही येवला विधानसभा मतदारसंघाची (Yeola Assembly Constituency) ओळख आहे. महायुतीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येवला विधानसभेचा गड छगन भुजबळ राखणार की माणिकराव शिंदे बाजी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येवला मतदारसंघ हा सुरुवातीला काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर शिवसेनेने या ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. 2004 साली छगन भुजबळ यांनी येवल्यात एन्ट्री घेतली. मंत्री भुजबळ यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून येवला मतदारसंघाची ओळख झाली. गेल्या चार पंचवार्षिकपासून भुजबळ येवल्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र, आता वेळी रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: